FIFA World Cup 2026 : भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! कुठे पाहता येणार सामने, किती आहे सबस्क्रिप्शन फी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु होणार आहे. पहिल्यांदाच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली FIFA World Cup 2026 चा प्रारंभ होणार आहे.यंदाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा ठरणार असून तब्बल 48 संघ आणि 104 सामने या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत.दरम्यान भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर भारतातील प्रसारण हक्कांचा प्रश्न सुटला आहे. भारतातील प्रसिद्ध नेटवर्कसपैकी एक Zee Entertainment ने फिफा सोबत २०३४ पर्यंतचा करार केला आहे.



भारतात फिफा वर्ल्ड कप २०२६ कुठे पाहता येणार ?


भारतातील फुटबॉल चाहते FIFA World Cup 2026 चे सर्व सामने ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहू शकतील. तसेच टीव्हीवर खालील चॅनेल्सवर सामन्यांचे थेट बरोडकास्टिंग केले जाणार आहे.


Unite8 Sports 1


Unite8 Sports 1 HD


Unite8 Sports 2


Unite8 Sports 2 HD





सब्स्क्रिप्शनसाठी किती पैस मोजावे लागतील ?


ZEE5 ने विश्वचषकसाठी दोन विशेष पॅक जाहीर केले आहेत
पहिला प्लान तीन महिन्यांचा तर वार्षिक प्लानही जाहिर करण्यात आले आहे.


3 महिन्यांचा प्लॅन – ₹799


वार्षिक प्लॅन – ₹1699





तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये दिग्गजांचा समावेश


विश्वचषकाच्या कव्हरेजसाठी झीने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फुटबॉलमधील अनेक मोठ्या नावांना जोडले आहे.


तज्ज्ञ पॅनल :ऑलिव्हर कान,बायचुंग भुतिया,गुरप्रीत सिंग संधू,अदिती चौहान,इगोर स्टिमॅक,ॲशली वेस्टवूड,रॉबिन सिंग,पॉल मेसफिल्ड,सीमा जसवाल,खुरी इराणी,अर्जुन पंडित





विश्वचषकातील प्रमुख सामने (IST वेळेनुसार)


12 जून


मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका – रात्री 12:30


14 जून


ब्राझील विरुद्ध मोरोक्को – पहाटे 3:30


15 जून


स्पेन विरुद्ध केप व्हर्डे – रात्री 9:30


17 जून


फ्रान्स विरुद्ध सेनेगल – रात्री 12:30


अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया – सकाळी 6:30


18 जून


इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया – पहाटे 1:30



नॉकआऊट फेरीचे वेळापत्रक


राऊंड ऑफ 32 : 28 जून ते 3 जुलै


राऊंड ऑफ 16 : 4 ते 7 जुलै


उपांत्यपूर्व फेरी : 9 ते 11 जुलै


उपांत्य फेरी : 14 व 15 जुलै


तिसऱ्या स्थानासाठी सामना : 18 जुलै


महाअंतिम सामना : 19 जुलै (न्यू जर्सी)

Comments
Add Comment

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि