Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी CIDच्या रडारवर; 2400 कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी नोटीस

बॉलिवूड : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचे नाव कर्नाटकातील कथित 2400 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याशी (Investment Scam) संबंधित तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कर्नाटक सीआयडीने (CID) सनी लिओनीला नोटीस बजावून काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे. (Sunny Leone)


मिळालेल्या माहितीनुसार, 'शिवम असोसिएट्स' आणि त्याचे प्रवर्तक शिवानंद नीलन्नवर (Shivanand Neelannavar) यांच्यावर बेकायदेशीर गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून सुमारे चार लाख गुंतवणूकदारांकडून हजारो कोटी रुपये उभारल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू असून आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधले जात आहेत.



तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चॅम्पेयन या कन्नड चित्रपटाची निर्मिती शिवानंद नीलण्णवर यांनी केली होती. या चित्रपटातील लोकप्रिय 'डिंगारा बिल्ली नानू' गाण्यात सनी लिओनीने विशेष भूमिका साकारली होती. या गाण्यासाठी तिला सुमारे एक कोटी रुपयांचे मानधन देण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.


सीआयडी सध्या या मानधनासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा स्रोत आणि पैशांच्या व्यवहारांचा तपशील तपासत आहे. याच पार्श्वभूमीवर सनी लिओनीला नोटीस पाठवून माहिती मागवण्यात आली आहे.


मात्र, तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, सनी लिओनीविरोधात सध्या कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा तिच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आलेले नाहीत. तिला केवळ माहिती आणि चौकशीच्या उद्देशाने नोटीस बजावण्यात आली असून तपासाचा केंद्रबिंदू आर्थिक व्यवहार आणि निधीचा स्रोत हा आहे.



दरम्यान, या घोटाळ्याच्या तपासात अनेक आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून सीआयडीकडून संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या