Ritu Tawde : धमक्यांना घाबरत नाही, बॉम्बस्फोट धमकीच्या ईमेल वर महापौर रितू तावडेंची प्रतिक्रिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज मंगळवारी १० जून २०२६ रोजी सकाळी नऊ वीस (९:२०) च्या सुमारास मला धमकी देणारा एक ईमेल आला. या संदर्भात महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने मला तत्काळ सूचना दिल्या असे महापौर रितू तावडे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले. व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही; असेही त्या म्हणाल्या.



धमकीचा मेल आल्याची माहिती मला पोलिसांनी दिली. मात्र, जनतेची कामे आणि आधीच नियोजित असलेल्या महत्त्वाच्या बैठका खोळंबून राहू नयेत, यासाठी मी पूर्वलक्षित कार्यक्रमानुसार महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहून बैठकांना हजेरी लावली. माझ्यासाठी कर्तव्याला नेहमीच पहिले प्राधान्य आहे आणि राहील, असे महापौर म्हणाल्या.



धमकीसारख्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि ते करतही आहेत; असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले.



माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने माझे वाहन, कार्यालयीन दालन आणि वैयक्तिक सुरक्षा बाबतची योग्य ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही प्रशासन त्यांच्या पातळीवर चोखपणे करेल, याचा मला विश्वास आहे, असे महापौर म्हणाल्या.



व्यक्तिशः मी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि इतर अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा आणि मला डगमगवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही शहरांच्या महापौरांना अशाच प्रकारच्या धमक्या आल्याचे मला समजले आहे. हे एक कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही; अशी शंका महापौर रितू तावडे यांनी उपस्थित केली.



राज्याच्या गृह खात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून योग्य ती कडक कारवाई निश्चित करतील. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आपले काम करत आहे आणि मी माझे जनसेवेचे व्रत सुरूच ठेवेन. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग मंदावणार नाही; असेही महापौरांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि