Tree Plantation on Coastal Road : विस्तारीत कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात १७७८ झाडे बाधित, बदल्यात लावणार सुमारे १६ हजार झाडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई किनारी रस्ते प्रकल्प (उत्तर) वर्सोवा आंतरबदल ते दहिसर भाईंदर मार्गावरील दहिसर आंतरबदल आणि गोरेगाव-मुलूंड लिंक रोड यांना जोडणारा उन्नत मार्ग, दहिसर (पश्चिम) लिंक रोड ते भाईदर (पश्चिम) मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील कोस्टल रोडच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या प्रकल्प कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात पर्यायी जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासर्व प्रकल्पात कापण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (Tree Plantation on Coastal Road)


मुंबई शहरामध्ये होणाऱ्या वाहतुकीची कोंडी दुर करण्यासाठी व त्या अनुषंगाने अधिका-अधिक वाहतुकीसाठी रस्त्याचे जाळे विकसीत करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई महानगरपालिकेमार्फत केलेल्या वाहतुकीच्या अभ्यासाचा अहवाल व मुंबई किनारा रस्त्याकरिता संयुक्त तांत्रिक समिती (२०११) यांचा अहवाल व त्यांच्या शिफारसी या सर्व बाबींच्या अनुषंगाने वर्सोवापासून पुढे गोरेगाव, मालाड, चारकोप, दहिसर, भाईदर दरम्यानच्या किनारी रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेले आहे. (Tree Plantation on Coastal Road)



या प्रकल्पांच्या मार्गरेषेत सुमारे ९९०४ जमिनीवरील वृक्ष बाधित होत आहेत. या बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात सुमारे ७०,००० वृक्षांचे प्रतिपूरक वनीकरण करणे आवश्यक असून त्या करिता अंदाजे ६० हेक्टर मोकळ्या जमिनीची आवश्यकता आहे अशी विनंती विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ मर्यादित ठाणे यांना करण्यात आली होती. त्यानुषंगाने त्यांनी १५,८४३ वृक्ष लागवड व ७ वर्षांकरिता संवर्धन करण्याकरिता मौजे. करंजाडे येथील १५ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे व त्याकरिता १२ कोटी ८१लाख ३३ हजार ६१५ एवढी रक्कम येत असल्याचे कळवले आहे. (Tree Plantation on Coastal Road)


यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, साकी विहार रोडसर्वे नं ७८ मौजे पासपोली, पवई (एस विभाग) येथे ३.७१५ एकर जागा या प्रकल्पाच्या मार्ग रेषेने बाधित होणाऱ्या वृक्ष पुनर्रोपण व सात वर्षांकरिता वृक्ष संवर्धन करण्यास्तव निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर एकूण ८८२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. (Tree Plantation on Coastal Road)



या सर्व प्रकल्पांतर्गत वर्सोवा ते बांगूर,चारकाेप, गोराई, गोराई जेट्टी, बोरीवली, दहिसर, मिराभाईंदर क्षेत्र आदी सर्व भागांमध्ये १०४७ झाडे कापली जाणार आहेत, तर ७३१ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. त्यामुळे एकूण १७७८झाडे कापली जाणार आहे तसेच पुनर्रोपित केली जाणार आहे. या बदल्यात एकूण १६ हजार २८६ झाडे पर्यायी जागेत लावली जाणार आहेत. वृक्ष प्राधिकरणाने प्रकल्पाला वृक्ष परवानगी देताना सूचवलेल्या भरपाई वनीकरणाच्या अटींच्या पुर्ततेसाठी शासकीय उपक्रमास नेमण्यासाठी प्रस्तावित देयक अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या व विशेषीकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ मर्यादित यांना शासकीय जमिनीवर वृक्ष लागवड करणे, वृक्ष प्रत्यारोपण व ७ वर्ष कालावधीकरता वृक्ष संवर्धन करण्यासाठी व त्यांच्या मागणीनुसार १२ कोटी ८१लाख ३३ हजार ६१५ रुपये अदा केले जाणार आहेत. (Tree Plantation on Coastal Road)

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि