Nitesh Rane : राज्यातील मासेमारी बंदी कालावधी १६ दिवसांनी वाढणार - मंत्री नितेश राणे यांचे सूतोवाच

- 'सिल्व्हर पापलेट'सह इतर प्रजातींच्या उत्पादनात होणार वाढ


मुंबई : राज्यातील मत्स्य साठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादन वाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल आणि परिणामी राज्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल, असे सूतोवाच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका मुलाखतीत केले आहे. शासनाच्या या प्रस्तावित निर्णयाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम कोकण किनारपट्टीवरील अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'सिल्व्हर पापलेट'सह इतर प्रमुख माशांच्या प्रजातींच्या उत्पादन वाढीवर होणार आहे.



मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अलीकडेच मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर प्रामुख्याने चर्चा झाली. सध्या राज्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारीसाठी बंदी लागू असते. हा काळ माशांच्या प्रजोत्पादनाचा (पैदाशीचा) असल्याने या काळात मासेमारी पूर्णपणे थांबवल्यास माशांच्या बीज निर्मिती प्रक्रियेला गती मिळते आणि समुद्रातील नैसर्गिक साठा वाढण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर, बंदीचा कालावधी वाढवून तो १५ ऑगस्टपर्यंत केल्यास मत्स्य उत्पादनात शाश्वत आणि भरीव वाढ होईल, असा तज्ज्ञांचा आणि शासनाचा अंदाज आहे. (Nitesh Rane)



नेमकी गरज का?


गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील बदलणारे हवामान, वाढती चक्रीवादळे आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांना समुद्रात जाणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरीकडे, जगभरातील अनेक प्रमुख सागरी देश आणि भारतामधील शेजारील गुजरात राज्याने निसर्ग संवर्धन आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी ७६ दिवसांची बंदी यशस्वीरीत्या लागू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी ७६ दिवस (१ जून ते १५ ऑगस्ट) करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.