Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख (Sikandar Shaikh) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात त्यांच्या थार गाडीचे मोठे नुकसान झाले असून वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने सिकंदर शेख या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. (Sikandar Shaikh car accident)



मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख हे प्रवासासाठी सांगोला-मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की थारच्या समोरील आणि बाजूच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे वृत्त समजताच सिकंदर शेख यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते सुरक्षित असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.



सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील कुस्तीविश्वातील एक मोठे नाव मानले जाते. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीसह अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवत त्यांनी राज्यासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या आक्रमक खेळशैलीमुळे आणि दमदार कामगिरीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.


दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास सुरू असून या घटनेनंतर कुस्तीविश्वातून सिकंदर शेख यांच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून