Navi Mumbai Crime : प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट! प्रेयसीची हत्या, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका गूढ आणि थरारक हत्याकांडाचा (Murder) पनवेल तालुका पोलिसांनी उलगडा केला आहे. प्रेयसीच्या लग्नाच्या आग्रहाला कंटाळून एका २७ वर्षीय तरुणाने तिची हत्या करून मृतदेह जाळल्याचा आरोप असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Navi Mumbai Crime)


११ एप्रिल रोजी चिंचवली-वाकडी गावाच्या हद्दीतील राजमती वनक्षेत्रात एका महिलेचा पूर्णतः जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र किंवा महत्त्वाचा पुरावा सापडला नव्हता.


तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि तांत्रिक माहितीची पडताळणी केली. त्यातून मृत महिलेची ओळख मुंब्रा-दिवा परिसरातील ३० वर्षीय अनितादेवी भगवान राजभर अशी पटली. तिच्याजवळ सापडलेली अंगठी, नथ, कानातील दागिने आणि मनगटावरील पवित्र दोरा हे ओळख पटविण्यासाठी महत्त्वाचे ठरले.




 

पुढील तपासात पोलिसांना अनितादेवीचा सतत संपर्क करण नामदेव पाटील या तरुणाशी असल्याचे आढळले. चौकशीसाठी बोलावूनही तो हजर न राहिल्याने संशय अधिक बळावला. मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत ताब्यात घेतले.


पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, महिला लग्नासाठी सातत्याने आग्रह धरत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. या नात्यातून सुटका मिळवण्यासाठी आरोपीने कट रचल्याचा आरोप आहे.


 

६ एप्रिल रोजी आरोपीने महिलेला आपल्या होंडा सिटी कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेले. तेथे लोखंडी सळीने तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगल परिसरात नेऊन कारच्या टाकीतील पेट्रोल काढून त्यावर ओतले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.


आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि