Goregaon Redevelopment : गोरेगावमधील प्रगतीनगर,मिठानगरमधील आश्रय योजनेतील पुनर्विकासात तब्बल १८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ वाढले

- प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या शुल्कात झाली सव्वा कोटींची वाढ


मुंबई, (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभागातील प्रगतीनगर आणि मिठानगर येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत केला जात असून या पुनर्विकासात तब्बल १८ हजार चौरस मीटरचे क्षेत्रफळ वाढले असून या वाढत्या क्षेत्रफळामुळे या प्रकल्प कामांचे व्यवस्थापन सल्लागारांच्या शुल्कात १ कोटी १२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी सल्लागाराला पाच कोटी रुपयांचे शुल्क मंजूर झाले होते. परंतु आता क्षेत्रफळ वाढल्यामुळे या कंत्राटदाराचे एकूण शुल्क ६ कोटी ०९ लाखांवर पोहोचले आहे. (Goregaon Redevelopment)


मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभागातील प्रगतीनगर आणि मिठानगर येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत पुनर्विकास प्रकल्पाकरता डिझाईन अँड बिल्ट टर्नकी गट-७ अंतर्गत कामासाठी मेसर्स स्थापती डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रा. लि. यांची सन २०२२ मध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला सुमारे ७७ हजार ७४८ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळ गृहीत धरून त्यांना ४ कोटी ९७ लाख रुपयांचे सेवा शुल्क मंजूर करण्यात आले होते. (Goregaon Redevelopment)



इमारत प्रस्ताव यांनी मंजूर केलेल्या आराखडयांप्रमाणे महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ यांनी मुळ बांधकाम क्षेत्रफळात प्रथम १३९६०.६३ चौ.मी. व तदनंतर ३५८८.२९ चौ.मी. अशाप्रकारे एकूण १७,५४८.९२ चौ.मी. इतकी वाढ होवून अंतिम आराखड्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे आणि पर्यावरण विभागाच्या अटींनुसार सुधारणा केल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ वाढून ९५ हजार २९६.९५ चौ.मी. इतके झाले आहे. त्यामुळे मूळ क्षेत्रफळाच्या तुलनेत सुमारे २२.५७ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम सल्लागारांच्या कामाच्या व्याप्तीवरही झाला असल्याचे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वाढीव क्षेत्रफळामुळे सल्लागारांना देण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात १ कोटी १२ लाख १६ हजार २८६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण सेवा शुल्काची रक्कम आता ६ कोटी ९ लाख २६ हजार ९४६ रुपयांवर पोहोचली आहे. (Goregaon Redevelopment)

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि