Potholes on Eastern Expressway : पूर्व द्रुतगती आणि पूर्व मुक्त मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक

- तब्बल १८ कोटींच्या कामांसाठी सात कोटींची अनामत रक्कम भरणार कंत्राटदार


मुंबई, (सचिन धानजी)


मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व मुक्त मार्गावरील खड्डे व खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुमारे १८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजित दरापेक्षा उणे ४१.०४ टक्के दराने कंत्राटदाराने बोली लावली असून या सुमारे १८ कोटी रुपयांच्या कामांसाठी चक्क ७ कोटी रुपये एवढी रक्कम कंत्राटदार अनामत रक्कम म्हणून महापालिकेकडे जमा करणार आहे. त्यामुळे १८ कोटी रुपयांच्या कामांसाठी ७ कोटी रुपयांची रक्कम अनामत ठेवण्यात येणार असल्याने प्रत्यक्षात कंत्राटदार एवढ्या कमी दरात कसे काम करणार असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. (Potholes on Eastern Expressway)


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २०२२ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या १९ किलोमीटर लांबीच्या पूर्व द्रुतगती महामार्गासह १८ किलोमीटरच्या पूर्व मुक्त मार्गाची देखभाल आता महापालिकेकडे आहे. दरवर्षी पावसाळ्यात या मार्गांवर खड्डे, रस्ते उखडणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या तक्रारी वाढत असल्याने यंदाही मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Potholes on Eastern Expressway)



पूर्व द्रुतगती महामार्गावरून दररोज लाखो वाहनांची वाहतूक होत असून राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी येणाऱ्या मान्यवरांच्या ताफ्यांचाही या मार्गावरून प्रवास होत असतो. त्यामुळे पावसाळ्यात खड्डेमुक्त आणि सुरक्षित प्रवासासाठी ही कामे तातडीने हाती घेण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. (Potholes on Eastern Expressway)


त्यामुळे पावसाळ्यात यातील रस्त्याचा खराब भाग तथा खड्डे सदृश्य परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कामासाठी एआयसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने कार्यालयीन अंदाजापेक्षा ४१.०४ टक्के कमी बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उणे दराने निविदेत पात्र ठरल्याने अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून कंपनीकडून ७ कोटी २६ लाख रुपयांची ठेव घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे. (Potholes on Eastern Expressway)



विशेष म्हणजे पावसाळा सुरु होत असून आता याबाबतचा प्रस्ताव तयार केल्याने प्रत्यक्षात पावसाळ्यात या रस्त्यांवरील खड्डे दुुरुस्त करणे किंवा खराब रस्त्यांची डागडुजी मास्टीक अस्फाल्टद्वारे करण्याचा प्रयत्न कशाप्रकारे केली जाईल हा प्रश्न होईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होत असतानाही दरवर्षी मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे यंदा या १८ कोटींच्या कामातून प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती सुधारते की पुन्हा एकदा डागडुजीपुरतेच मर्यादित राहते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहेत. (Potholes on Eastern Expressway)

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि