Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)

प्रशासकीय अडचणी दूर करून सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेबाबत प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा, त्यात कालसुसंगत बदल करण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत, त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच, महानगरपालिका रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. यापुढे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा आणि उपक्रमाबाबत नियमितपणे आढावा बैठक आयोजित केली जाईल, असेही शेलार यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्याबाबतची सद्यस्थिती आणि आधुनिकरण यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ८ जून २०२६ रोजी पार पडली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेलार हे बोलत होते.

आमदार अमित साटम, आमदार श्रीमती विद्या ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, महानगरपालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी, मुंबई महानगरपालिका सध्या देत असलेल्या आरोग्य सेवेबाबत संपूर्ण माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

तर सर्व आमदारांनी या आरोग्य सेवांमध्ये प्रत्यक्ष येत असलेल्या अडचणी, रुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या, रुग्णालयांचा पुनर्विकास आणि इतर प्रशासकीय अडचणी याबाबत सूचना मांडल्या तसेच तक्रारी नोंदवल्या.

पालकमंत्री शेलार यांनी सांगितले की, महानगरपालिकेने राज्याचा आरोग्य विभाग, नगर विकास विभाग या सगळ्यांशी संबंधित असणाऱ्या प्रशासकीय बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पुढील बैठक आयोजित करावी. रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल आणि एकूणच चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशा दृष्टीने सर्व पैलूंचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, ज्या प्रशासकीय सुधारणा अपेक्षित आहेत, त्याचा आराखडा सादर करावा, असे शेलार म्हणाले. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांप्रमाणे आरोग्य सेवा पुरवठा यावी यासाठी आर्थिक तरतुदींच्या पलीकडे जाऊन आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा (मेडिटेक) अवलंब करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू करावेत, अशी सूचनाही शेलार यांनी केली.

मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील आवश्यक ती रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर करावी. कोविड काळामध्ये महानगरपालिकेसाठी कंत्राट तत्त्वावर सेवा बजावलेल्या मनुष्यबळाला या विहित भरती प्रक्रियेत एकवेळचे विशेष धोरण म्हणून प्राधान्य देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना महापौरांनी केली. सिद्धार्थ रुग्णालय, राजावाडी रुग्णालय यासह ज्या ज्या रुग्णालय आणि दवाखान्यांचा पुनर्विकास लांबला आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने विशेष लक्ष पुरवावे. अडचणींचे युद्ध पातळीवर निराकरण करावे. प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नर्सिंग कॉटेज सुविधा पुरवावी, झिरो प्रिस्क्रिप्शन सेवा लवकर सुरू करावी, टाटा कर्करोग रुग्णालय लगत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉरिडोर करावा, केइएम रुग्णालयामध्ये एआरटी विभाग सुरू करावा तसेच तेथील संग्रहालयाचे नूतनीकरण करावे, कूपर रुग्णालयात ईएमएस वॉर्ड तयार करावा तसेच तेथे महानगरपालिकेने स्वतःच्या अखत्यारीतील शव विच्छेदन केंद्र (post mortem center) सुरू करावे, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयात मॉड्युलर ओटी तयार करावा, यासह इतर विविध निर्देश महापौरांनी दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता कक्ष हा विभाग स्थापन करावा. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर रुग्णांना सहाय्यता पुरवण्यासाठी सुलभ आणि पारदर्शक अशी प्रणाली विकसित करावी, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले.

आमदार अमित साटम म्हणाले की, मुंबईभर आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यावर भर द्यावा. डायलिसिस सुविधांचा विस्तार करावा, शहरव्यापी 'मधुमेहमुक्त मुंबई' अभियान सुरू करावे, प्रस्तावित कर्करोग उपचार बेड वेळेवर कार्यान्वित करावे, मानसिक आरोग्य केंद्रे स्थापन करावीत आणि प्रत्येक रुग्णालयात रुग्णशय्या संख्या लक्षात घेऊन आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करावी, इत्यादी मागण्या साटम यांनी यावेळी केल्या.

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत येत्या काही वर्षांत पाच हजार नव्या रुग्णशय्या उपलब्ध होणार असल्याने त्या प्रभावीपणे चालविण्यासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या नियोजनाबाबतही महानगरपालिकेने आतापासूनच सर्वंकष मनुष्यबळ आराखडा तयार करावा. परिचारिका, ओपीडी डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णांशी थेट संपर्कात येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक सहानुभूतीपूर्ण, सन्मानपूर्वक आणि कार्यक्षम सेवा मिळू शकेल, असे साटम यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग