CYBER CRIME : सावधान! व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने गंडा; नवी मुंबईतील व्यावसायिकाची १ कोटी ९ लाखांची फसवणूक

NAVI MUMBAI : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. नवी मुंबईत शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे (High Returns) आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची तब्बल १ कोटी ९ लाख ३१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.



नेमका प्रकार काय घडला?


ही घटना २६ मार्च ते ३ जून २०२६ या कालावधीत घडली. तक्रारदार घरी असताना त्यांना परस्पर 'IIFL Invesco VII 2026 10x Growth Strategy Y113' नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. आर. वेंकट रमण आणि टिना मल्होत्रा या नावाने वावरणाऱ्या भामट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.



फसवणुकीचे 'जाळे' कसे विणले?


बनावट कागदपत्रे: आरोपींनी 'IIFL Capital'च्या नावाने भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे (SEBI) बनावट प्रमाणपत्र दाखवून गुंतवणुकीची स्कीम कायदेशीर असल्याचा विश्वास दिला.


भ्रामक ॲप: गुंतवणुकीसाठी त्यांना 'IFLVIP' नावाचे एक संशयास्पद ॲप डाऊनलोड करायला लावले. या ॲपवर गुंतवणूकदाराला त्यांच्या रक्कमेवर मोठा नफा होत असल्याचे खोटे आकडे दाखवून त्यांना भूलवण्यात आले.


फसवणुकीचा धक्का: जेव्हा तक्रारदाराला त्यांच्या मूळ गुंतवणुकीची रक्कम आणि नफा परत हवा होता, तेव्हा त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.


सायबर पोलिसांचा इशारा: या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत असून, फसवणूक करणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन, बनावट ॲप निर्माते आणि ज्या खात्यांवर पैसे वळवण्यात आले त्या खातेधारकांचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त

Mumbai Mayor : त्यांनी पेंग्विन आणला, आम्ही सिंह आणणारच; महापौर स्वत: अधिकाऱ्यांसह गुजरातला जाणार

पेंग्विन खाली मान करून उभे असतात म्हणून पहायला आवडतात मुंबई : भायखळा येथील राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात