Shivrajyabhishek Din Sohala 2026 : रायगडावर शिवराज्याभिषेकाचा जल्लोष; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला गड, लाखो शिवभक्तांची ऐतिहासिक उपस्थिती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त (Shivrajyabhishek Din Sohala 2026) दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आज अभूतपूर्व उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून, संपूर्ण गड भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. "जय भवानी, जय शिवाजी"च्या घोषणांनी अवघा रायगड दुमदुमून गेला आहे.


शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक मानला जातो. ६ जून १६७४ रोजी याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्याच ऐतिहासिक क्षणाची आठवण जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)



यंदाच्या सोहळ्यासाठी राजसदरेवरील मेघडंबरीची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. गडावर सर्वत्र भगवे ध्वज, पताका, पारंपरिक सजावट आणि शिवकालीन वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवभक्तांनी पहाटेपासूनच गडावर गर्दी केली असून, पोवाडे, लेझीम, ढोल-ताशे आणि पारंपरिक युद्धकलेच्या सादरीकरणामुळे रायगडावर शिवकाळ पुन्हा अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना येत आहे. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)


सोहळ्याची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवपालखीची भव्य मिरवणूक राजसदरेकडे निघाली. उत्सवमूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. हा क्षण पाहताना अनेक शिवभक्त भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)


यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजसदर ते जगदीश्वर मंदिर अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर मंदिर परिसर आणि शिवसमाधी स्थळी हजारो शिवभक्तांनी नतमस्तक होत छत्रपतींना अभिवादन केले. शिवसमाधीला मानवंदना दिल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)



रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड आणि आसपासच्या परिसरातही शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून सुरक्षा, वाहतूक आणि पाणीपुरवठ्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावरही ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमापूर्वी ढोल-ताशा पथकांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला असून, विविध मान्यवर आणि शिवप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)


रायगड आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आजही लाखो लोकांच्या मनात तितक्याच श्रद्धेने आणि अभिमानाने जिवंत असल्याचे चित्र या भव्य सोहळ्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळाले. (Shivrajyabhishek Din Sohala 2026)

Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि