Nashik : सिंहस्थाच्या ध्वजस्तंभ शिलान्यास सोहळा ११ जूनला

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले असून हा सोहळा गुरुवार, दि. ११ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून संपन्न होणार आहे.


धार्मिक कार्यक्रमासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य (रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम) यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा पार पडणार आहे. ते वैष्णव आखाड्यांचे जगद्गुरू रामानंदाचार्य असल्याने वैष्णव आखाड्यांच्या सर्व प्रमुखांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.



कार्यक्रमास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिगंबर अनी आखाड्याचे वैष्णवदास महाराज, महंत माधवदास महाराज, निर्वाणी अनी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, निर्मोही अनी आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, महंत भक्तीदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री आणि महंत रामस्नेहीदास महाराज उपस्थित राहणार आहेत.


सिंहस्थाच्या तयारीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनामुळे आगामी कुंभमेळ्याच्या धार्मिक कार्यांचा विधिवत प्रारंभ होणार आहे. वैदिक मंत्रोच्चार, संत-महंतांचे आशीर्वाद आणि धर्मपरंपरेच्या साक्षीने संपन्न होणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Delhi Crime: मध्यरात्री थरार! मुस्कानच्या मारेकरी इमरानचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर

दिल्ली : दिल्लीतील टिळक नगर परिसरात 21 वर्षीय मॉडेल आणि विद्यार्थिनी मुस्कान हिच्या हत्या प्रकरणात गुरुवारी

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत