Thursday, June 4, 2026

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचा यंदाचा वर्धापनदिन अजितदादांना समर्पित

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचा यंदाचा वर्धापनदिन अजितदादांना समर्पित

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात होणार कार्यक्रम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन यंदा पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना समर्पित केला जाणार आहे. पक्षाच्या उभारणीत, जडणघडणीत आणि देशभरातील विस्तारात अजित पवार यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी हा विशेष निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

१० जून रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या अनुमतीने आणि पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सर्वसंमतीने यंदाचा वर्धापनदिन सोहळा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभागृहात एकत्र येण्यास सुरुवात होईल आणि दुपारी ३ वाजता या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत दादांचे (अजित पवार) नेतृत्व मार्गदर्शक ठरले असल्याने, संपूर्ण सोहळा त्यांना समर्पित राहूनच पार पडेल असे नियोजन सर्व पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >