Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील दादर येथून रायगड पायथ्याजवळील सांदोशीपर्यंत विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर होईल असं मानल जात आहे.



हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या दुर्गराज रायगडावर यंदा २७ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीने मुंबई ते सांदोशी विशेष बससेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस सेवाचा शुभारंभ समितेचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते १ जून रोजी करण्यात आला होता. यावेळी समितीचे पदाधिकारी, शिवभक्त आणि विविध मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी समितीचे सदस्य दीपेश पटवर्धन यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.



रायगडावर कसे पोहोचाल?


Raigad Fort येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे शहर म्हणजे Mahad आहे. महाड बसस्थानकापासून पाचाड गाव किंवा रोपवे स्टेशनपर्यंत एसटी बस आणि खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. महाड आगारातून पहाटे ५.३० वाजल्यापासून पाचाडसाठी बस सुटतात. त्या बसने पाचाडाकडे येणे शक्य आहे. पाचाडहून महाडकडे शेवटची बस साधारणता सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत उपलब्ध असते.तसेच मुंबईपासून खासगी वाहानाने गेल्यास आठशे ते हजार रुपये खर्च होतो . परंतु आता बससेवेमुळे खर्च आणि वेळ दोन्हीही कमी लागेल.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :