महाजनांचा फॉर्म्युला ठरणार यशस्वी ? गणेश गिते माघारीच्या तयारीत, गोकुळ गितेंची निवडणूक लढण्याची भूमिका कायम

Nashik Vidhan Parishad Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज गुरुवार (दि. ४) हा अंतिम दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत सुरू असलेल्या बंडखोरीमुळे ही लढत दुरंगी होणार की तिरंगी, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबतचे चित्र आज स्पष्ट होणार आहे.


महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे (Narendra Darade) मैदानात आहेत. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) , त्यांचे बंधू गोकुळ गीते Gokul Gite) तसेच प्रसाद हिरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय अजित पवार गटाचे गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसधुणे यांनीही रिंगणात उतरत निवडणुकीची रंगत वाढवली आहे.



गणेश गिते माघारीच्या मार्गावर ?


गणेश गिते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाशिक दौऱ्यात बोलताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे परिस्थिती हाताळतील आणि गिते यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात असून गणेश गिते माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



गोकुळ गितेंची भूमिका कायम


गणेश गिते यांनी माघारीची तयारी दर्शवल्याची चर्चा असली तरी गोकुळ गिते अद्याप निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता भावाची समजूत काढण्याची जबाबदारी गणेश गिते यांच्यावरच आली आहे. विरोधी गटांकडून गोकुळ गिते यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पुढील काही तासांत राजकीय समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Forever Young Look : नेहमी चिरतरुण दिसायचंय? मग घरच्याघरी करा हे सोपे उपाय; त्वचा राहील तजेलदार आणि निरोगी

मुंबई : वाढते वय थांबवता येत नसले, तरी योग्य जीवनशैली आणि त्वचेची नियमित काळजी घेतल्यास दीर्घकाळ चिरतरुण आणि

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका