FIFA World Cup 2026 : फुटबॉलमध्ये मोठे बदल ! वर्ल्ड कपपूर्वी फिफाकडून नवीन नियमांची घोषणा

मुंबई : फिफा वर्ल्ड कप २०२६ (FIFA World Cup 2026) ची सुरुवात 11 जूनपासून होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशात खेळवला जाणार आहे. प्रथमच 48 संघ सहभागी होणार असल्याने स्पर्धा अधिक भव्य होणार आहे. पण चर्चा फिफाने प्रस्तुत केलेल्या नवीन नियमांची होत आहे . खेळातील शिस्त, पारदर्शकता आणि वेळेचा अपव्यय रोखण्यासाठी FIFA ने अनेक कठोर नियम लागू केले जातील अशी घोषणा केली आहे .



फिफा वर्ल्ड कप 2026 साठी लागू केलेले नवे नियम


१. तोंड झाकून बोलल्यास थेट रेड कार्ड


सामन्यादरम्यान खेळाडू अनेकदा तोंड झाकून संवाद साधताना दिसतात. मात्र आता हा प्रकार महागात पडू शकतो. वादग्रस्त किंवा संघर्षाच्या प्रसंगी एखादा खेळाडू हात, जर्सीने तोंड झाकून बोलताना दिसल्यास त्याला थेट रेड कार्ड दाखवले जाणार आहे.


२. थ्रो-इन आणि गोल किकसाठी 5 सेकंदांचा नियम


अनेकदा खेळाडू वेळ काढण्यासाठी गोल किक आणि थ्रोच्या वेळी काही ना काही नाटक करताना दिसतात. हा प्रकार थांबवण्यासाठी फिफाने आता गोल किक आणि थ्रो करण्यासाठी पाच सेकंदांचा वेळ निश्चित केला आहे. आता थ्रो-इन आणि गोल किक घेताना पंच 5 सेकंदांचे काउंटडाउन सुरू करतील. वेळ संपल्यानंतरही चेंडू खेळात आला नाही तर चेंडूचा ताबा किंवा कॉर्नर किक थेट विरोधी संघाला दिली जाईल.


३. खेळाडू बदलीसाठी १० सेकांदांचा वेळ


बदलीचा इशारा मिळाल्यानंतर खेळाडूने 10 सेकंदांच्या आत मैदान सोडले पाहिजे. उशीर झाल्यास बदली खेळाडूला मैदानात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल आणि त्या काळात संबंधित संघाला एक खेळाडू कमी घेऊन खेळावे लागेल.


४.दुखापतीनंतर 1 मिनिट मैदानाबाहेर


समान्यादरम्यान एकदा खेळाडला दुखापत झाली तर त्याला वैद्यकीय उपचारानंतर किमान एक मिनिट मैदानाबाहेर राहावे लागेल. मात्र, डोक्याला दुखापत, गंभीर टक्कर किंवा पेनल्टीच्या दुखापतीवेळी हा नियम लागू होणार नाही.


५. पंचांशी वाद ? फक्त कर्णधारालाच परवानगी


खेळाडूंना पंचांशी वाद घालता येणार नाही. केवळ संघाच्या कर्णधारालाच पंचांशी चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंचांना घेरणे, आक्रमकपणे वाद घालणे किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे असे केल्यास खेळाडूंना तात्काळ यलो कार्ड दिले जाईल.


६.निर्णयावर रागावून मैदान सोडल्यास कठोर कारवाई


अनेकदा सामन्यादरम्यान खेळाडू पंचांच्या निर्णायाने नाखुश होऊन थेट मैदान सोडतात. जर एखाद्या संघाने पंचांच्या निर्णयाचा निषेध म्हणून मैदान सोडले, तर संबंधित खेळाडूंवर रेड कार्डची कारवाई करण्यात येणार आहे.


७.गोलकीपरच्या उपचारादरम्यान रणनीती बैठकीवर बंदी


गोलकीपर उपचार घेत असताना प्रशिक्षक किंवा खेळाडूंना मैदानाबाहेर एकत्र येऊन रणनीती आखण्याची परवानगी नसेल. FIFA ने याला वेळकाढूपणाचा प्रकार मानले आहे. त्यामुळे असं केल्यास आता संघाला किंवा खेळाडूला कारवाईला सामोरे जावे लागेल.


८. VAR ची शक्ती वाढली


2026 वर्ल्ड कपमध्ये VAR अधिक प्रभावी भूमिका बजावणार आहे. चुकीचे दुसरे यलो कार्ड, चुकीची खेळाडू ओळख आणि काही विशिष्ट निर्णयांमधील स्पष्ट चुका VAR च्या मदतीने त्वरित दुरुस्त करता येतील.



इतिहासातील सर्वात वेगळा वर्ल्ड कप


48 संघ, विक्रमी सामने आणि कठोर नियमांमुळे FIFA World Cup 2026 हा फुटबॉल इतिहासातील सर्वात वेगळा आणि चर्चेचा विश्वचषक ठरणार आहे. नवीन नियमांमुळे खेळ अधिक वेगवान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच