Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; आजोबा अन नातवाचा मृत्यू

चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात (Rahud Ghat) मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दोन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चांदवड बाजूकडून मालेगाव (Malegaon) बाजूकडे जाणाऱ्या हाइड्रा क्रेन, ॲप रिक्षा, पिकअप व आयशर यांच्यात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला.


दरम्यान, जखमींवर चांदवड ( Chandwad ) येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे. अपघातामुळे राहुड घाटातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.



नेमकं काय घडलं ?


चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या हायड्रा क्रेन, अॅपे रिक्षा, पिकअप व आयशर यांच्यात मंगळवारी (दि. २) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. राहुड घाटातील तीव्र उतारावर गतिरोधकाजवळ घडलेल्या या विचित्र अपघातात अब्दुल कय्युम अब्दुल रज्जाक (वय ६२) आणि त्यांचा ११ वर्षीय नातू अब्दुल आहिल अब्दुल रहेमान यांचा जागीच मृत्यू झालाय.


तर योगेश अशोक बाविस्कर (वय २७) आणि बारकू सुभाष वैद्य (वय २३, दोघे रा. खडकी ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे.


या अपघातातील हायड्रा क्रेन घेऊन जाणारा चालक अनुज संजय सिंह (वय २२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत व जखमींच्या नातलगांनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस (Chandwad Police) करीत आहेत.

Comments
Add Comment

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Narayan Rane : देवबाग नदीकाठ संरक्षण प्रकल्पाला गती देण्यासाठी नारायण राणेंचे केंद्राला साकडे; केंद्रीय पोलाद मंत्र्यांकडे पत्र देऊन केली मागणी

मुंबई : सिंधुदुर्गातील देवबाग येथील कर्ली नदीकाठ संरक्षण प्रकल्प रखडू नये आणि त्याच्या कामाला वेग मिळावा यासाठी

Dattatray Bharne : अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा इशारा

मुंबई : "शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Consumer Court Case : माहिती न देता डेबिट कार्ड ब्लॉक करणे फेडरल बँकेला पडले महागात; ग्राहक न्यायालयाने ठोठावला १.२५ लाखांचा दंड

नवी दिल्ली: जर एखाद्या बँकेने आपल्या ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता त्याचे डेबिट कार्ड ब्लॉक