Terrorist Hufaiza : दाऊद-ISI मॉड्यूलवर मोठा घाव; मुंबईतून दहशतवादी हुफैजा अटकेत, दहशतवादी जाळ्याचा तपास तीव्र

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIशी कथित संबंध असलेल्या हुफैजा (Terrorist Hufaiza) संशयित दहशतवाद्याला मुंबईतून अटक केली आहे. या अटकेमुळे पाकिस्तानस्थित गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कच्या भारतातील कारवायांबाबत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह मुंबई ATS आणि गुप्तचर यंत्रणा गेल्या अनेक आठवड्यांपासून हुफैजाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. मुंबईतील विविध भागांमध्ये छापेमारी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी रात्री संयुक्त कारवाई करत त्याला अटक करण्यात यश आले. (Terrorist Hufaiza)



तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हुफैजा (Terrorist Hufaiza) हा ISI एजंट आणि मुंबईतील कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडाचा निकटवर्तीय मानला जातो. मुन्ना झिंगाडा सध्या पाकिस्तानातील कराची येथे वास्तव्यास असल्याचा संशय असून तेथून तो आपल्या साथीदारांना निर्देश देत असल्याची माहिती समोर आली आहे. हुफैजा हा त्याच्याकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार विविध कामे करत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तसेच, मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये हुफैजाला दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा मानले जाते. त्याचे डी-कंपनीशी असलेले संबंध, आर्थिक व्यवहार, तसेच संभाव्य दहशतवादी कारवायांमधील सहभाग याबाबत तपास सुरू आहे.



चार राज्यांमध्ये कारवाई, नऊ संशयित अटकेत :


या मॉड्यूलविरोधातील मोहिमेदरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आतापर्यंत नऊ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाब या चार राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून छापेमारी सुरू होती. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर ही व्यापक मोहीम राबवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे मॉड्यूल पाकिस्तानस्थित घटकांच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचत होते का, याचाही तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून डिजिटल उपकरणे, संपर्कांची माहिती आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित पुरावे मिळाल्याचे सांगितले जात आहे. (Terrorist Hufaiza)



चौकशीतून आणखी मोठे खुलासे अपेक्षित :


हुफैजाच्या अटकेनंतर डी-कंपनी आणि ISIशी संबंधित आणखी किती व्यक्ती भारतात सक्रिय आहेत, याचा शोध घेण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे. मुन्ना झिंगाडाने त्याला कोणती लक्ष्ये दिली होती, तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याच्या माध्यमातून नव्या सदस्यांची भरती केली जात होती का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या प्रकरणात आणखी काही अटकसत्र होण्याची शक्यता असून तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवत आहेत. (Terrorist Hufaiza)

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे