Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा (Bharat Taxi Service) सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी शासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू आहेत. या नव्या उपक्रमामुळे चालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून प्रवाशांनाही अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. (Bharat Taxi App)

राज्यात ऑनलाइन कॅब आणि टॅक्सी सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक विविध मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासासाठी वाहनांची बुकिंग करतात. याच पार्श्वभूमीवर सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय पुढे आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक टॅक्सी चालकांना उद्योगाची नवी दिशा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला या सेवेसाठी आवश्यक नियमावली तयार करण्याचे आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच या प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली असून त्यामध्ये योजनेच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.



सहकार भारत टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश टॅक्सी चालकांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे आणि त्यांना स्थिर उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देश हा आहे. चालकांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून थेट जोडले जाणार असल्याने त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना देखील कमी खर्चा

मिळालेल्या माहितीनुसार,या सेवेची माहिती सहकार भारत टॅक्सीचे प्रतिनिधी असलेले कर्नल हिमांशु यांनी दिली. या सेवेची सुरुवात प्रथम मुंबईत केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्येही विस्तार करण्यात येणार आहे.

या नव्या सहकारी टॅक्सी मॉडेलमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील, तर चालकांसाठीही उत्पन्न वाढीचा नवा मार्ग खुला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सेवेमुळे प्रवाशांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवा राज्यातील काही छोट्या शहरात सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून