सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून देशभरात हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे रेल्वेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, टेक्निशियन पदांच्या एकूण ६,५९४ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड-१ आणि टेक्निशियन ग्रेड-३ या पदांचा समावेश आहे.

या भरतीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी १,४०० हून अधिक जागा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांना रेल्वे सेवेत प्रवेश मिळवण्याची चांगली संधी मिळणार आहे.

सध्या खासगी क्षेत्रात चांगले वेतन मिळत असले तरी नोकरीची हमी नसल्याने अनेक तरुण सरकारी नोकरीकडे वळताना दिसत आहेत. सुरक्षित करिअर, निश्चित वेतन, निवृत्तीवेतनासह विविध सुविधा आणि स्थिरता यामुळे सरकारी नोकऱ्यांना मोठी पसंती दिली जाते. त्यातही भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्या संस्थांपैकी एक मानली जाते.

भरती प्रक्रियेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची अंतिम तारीख यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत जाहीर केली जाणार आहे.

रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील आणि देशभरातील हजारो तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.

 

 
Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास