Nashik Bus Fire News : धावत्या एसटीला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

Nashik Bus Fire News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Agra National Highway) चांदवडजवळील रेणुकादेवी घाटात मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. मालेगावहून नाशिककडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ५४ प्रवासी सुखरूप बचावले, तर काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.


मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास बस रेणुकादेवी घाटातून प्रवास करत असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली. चालक आणि वाहकाने वेळीच सतर्कता दाखवत सर्व प्रवाशांना तातडीने बसबाहेर उतरवले.



काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक


प्रवासी सुरक्षित बाहेर पडताच आगीने विक्राळ रूप धारण केले. काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी होती की, बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. घटनेची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषद तसेच टोल नाक्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.


दरम्यान, या घटनेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत जळालेली बस बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Bhiwandi : भिवंडीत ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण, मारहाणीतील गंभीर जखमांमुळे ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडीतील ठाणे रोड परिसरात, रोज घराबाहेर बसून धिंगाणा घालणाऱ्यांना हटकण्याची मोठी किंमत एका कुटंबाला

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा