कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचत निष्पाप तरुणाची हत्या (Murder) केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक (Arrest) केली असून पुढील तपास सुरू आहे. (Jalna Crime News)

काही दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका कारला आग लागल्याची घटना समोर आली होती. कार पूर्णपणे जळून गेली होती आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटवताना काही विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाथी लागली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गवळी हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने संदीप चव्हाण या तरुणाला लक्ष्य केले आणि त्याला ठार मारायचे ठरवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सर्वप्रथम संदीपचा खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून दिला आणि वाहनाला आग लावण्यात आली. कारमधील जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच असल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.

मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि विविध तपासाच्या आधारे संपूर्ण कट उघड केला. तपासात नितीन गवळी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिघांवर गुन्हा दाखल केला आणि जाफराबाद येथून तिघांना अटक केली.

या घटनेमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून स्वतःच्या फायद्यासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास