नोंदणीकृत फेरीवाल्यांना 'क्यूआर कोड' ओळखपत्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका क्षेत्रातील ९९,४३५ नोंदणीकृत अधिकृत

"> फेरीवाल्यांना येत्या १० जूनपासून प्रत्येक प्रभाग (वॉर्ड) कार्यालयामार्फत 'क्यूआर कोड' असलेले विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लवकरात लवकर 'टाऊन वेंडिंग समिती'मध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करून समितीचे काम प्रत्यक्ष सुरू केले जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.



मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. या बैठकीला शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर आणि फेरीवाला संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


आयुक्तांसोबत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत शिष्टमंडळाने फेरीवाल्यांच्या सुरक्षित व्यवसायासाठी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. न्यायालयाने मुंबईत ज्या २० संवेदनशील ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे, ती २० ठिकाणे वगळता अन्य सर्व ठिकाणी पालिकेने अधिकृत 'फेरीवाला क्षेत्र' (Hawking Zones) घोषित करावेत आणि त्यांना तिथे सन्मानाने व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. प्रशासनाने ही मागणी तत्त्वतः मान्य करत १० जूनपासून ओळखपत्र वाटपाची घोषणा केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार 'टाऊन वेंडिंग समिती' स्थापन करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने वेगवान केली आहे. या समितीत लवकरच अशासकीय सदस्यांचा समावेश केला जाईल. या समितीमुळे मुंबईतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन, जागा वाटप आणि त्यांचे हक्क कायदेशीररीत्या संरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.



बांगलादेशींवर कारवाई व्हायलाच हवी


सध्या मुंबईत फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या अनधिकृत कारवाईवर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी काही प्रश्न उपस्थित केले. केवळ राजकीय नेत्यांच्या तक्रारींवरून सूडबुद्धीने कोणतीही कारवाई न करता, ती पूर्णपणे कायदेशीर चौकटीतच व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. निरुपम पुढे म्हणाले, "मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी मुस्लिमांवर पालिकेने आणि पोलिसांनी कडक कारवाई करायलाच हवी. मात्र, प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत नेमके किती बांगलादेशी घुसखोर आढळले, याची आकडेवारी जाहीर करावी. बांगलादेशींच्या नावाखाली मुंबईतील स्थानिक मराठी आणि उत्तर भारतीय फेरीवाल्यांना विनाकारण त्रास दिला जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे."

Tags
sanjay nirupambmcRegistered HawkersQR Code Identity Card(Town Vending Committee
Comments
Add Comment

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Mumbai Crime : शिक्षकाच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर, मुंबईच्या महापौरांशी जोडलं नाव; गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर ऋतू तावडे (Ritu Tawde) यांचे पती असल्याचा खोटा दावा करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा