Norway Chess: नॉर्वे चेसमध्ये भारतीयांचा दमदार कमबॅक! प्रज्ञानानंद-गुकेशची विजयी चाल; दिव्या देशमुख विजेतेपदाच्या शर्यतीत कायम

मुंबई : सहाव्या फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय बुद्धिबळपटूंनी नॉर्वे चेस स्पर्धेत शानदार पुनरागमन केले आहे. सातव्या फेरीत आर. प्रज्ञानानंद, डी. गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी विजय मिळवला आहे. या विजयसह त्यांचे विजेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राहिले आहे.


प्रज्ञानानंदची शानदार कामगिरी


भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाला क्लासिकल सामन्यात पराभूत करत तीन गुण मिळवले आहेत. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानानंदने 26व्या चालीपासून सामन्यावर पकड मजबूत करत प्रतिस्पर्ध्याला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले.


गुकेशने टायब्रेकरमध्ये दाखवली कमाल


विश्वविजेता डी. गुकेश मागील सामन्यात अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्धच्या क्लासिकल सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र सामना ड्रॉ राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन टायब्रेकमध्ये गुकेशने शानदार खेळ करत विजय मिळवला. या विजयातून गुकेशने दीड गुणांची कमाई केली.


दिव्या देशमुखची मोठी बाजी


महिला गटात भारताच्या दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीला आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभूत करून विजेतेपदाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे. या विजयामुळे दिव्याच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. महिला गटात तिने सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. महिला गटात कझाकिस्तानची बिबिसारा असाउबायेवा साडेबारा गुणांसह अव्वल स्थानी आहे. दिव्या देशमुख दुसऱ्या स्थानावर असून पुढील फेरीत या दोघींमध्ये थेट सामना होणार आहे.


ओपन गटात रोमांचक स्पर्धा


ओपन गटात वेस्ली सो साडेबारा गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. अलीरेझा फिरोजा दहा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर प्रज्ञानानंदा, मॅग्नस कार्लसन आणि विन्सेंट कीमर प्रत्येकी नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानांवर आहेत. या गटात चांगली चुरस पहायला मिळत आहे. टॉप तीन खेळांडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे अखेरचे काही सामने आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.


भारतीय खेळाडूंचे पुनरागमन


सहाव्या फेरीत सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सातव्या फेरीत मिळालेल्या विजयांमुळे भारतीय चाहत्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. आता उर्वरित फेऱ्यांमध्ये प्रज्ञानानंद आणि दिव्या देशमुख यांच्याकडे विशेष लक्ष आहे.

Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच