IND vs AFG Test : टीम इंडियात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणाऱ्या आकिब नबीला BCCI ने दिली संधी; प्लेइंग-११ मध्ये उलथापालथ

Mumbai : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये 60 विकेट्स घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाज आकिब नबी डारला अखेर भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. मात्र, त्याचा 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याला या एकमेव कसोटी सामन्यासाठी बॅक-अप खेळाडू म्हणून भारतीय संघात घेतले आहे.


60 विकेट्स घेऊनही संघाबाहेर


जम्मू काश्मीरच्या 24 वर्षीय आकिब नबीने यंदाच्या रणजी ट्रॉफी हंगामात अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 12.57 च्या सरासरीने 60 विकेट्स घेतल्या आहेत. या दमदार कामगिरीमुळे त्याने 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कारही पटकावला होता. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. निवड समितीने मुख्य संघात स्थान न दिल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता बीसीसीआयने आकिब नबीला 'बॅक-अप' खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो संघासोबत सराव करणार असून गरज पडल्यास त्याचा पर्याय म्हणून विचार केला जाऊ शकतो.



रणजी फायनलमध्ये दिग्गजांना दिला धक्का


कर्नाटकविरुद्धच्या रणजी अंतिम सामन्यात आकिब नबीने केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि करुण नायर यांसारख्या अनुभवी फलंदाजांना बाद करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरने कर्नाटकला पराभूत केले होते. या कामगिरीमुळे तो क्रिकेटविश्वाच्या चर्चेंचा नवा केंद्रबिंदु झाला.


निवड समितीचे स्पष्टीकरण


मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आकिबच्या निवडीबाबत बोलताना सांगितले की, भारतातील खेळपट्ट्यांवर एकाच वेळी अनेक वेगवान गोलंदाजांना संधी देणे कठीण आहे. त्यामुळे काही गुणवंत खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागते. निवड समितीने आकिब नबीऐवजी पंजाबच्या गुरनूर ब्रारवर विश्वास दाखवला आहे. ब्रारने रणजी ट्रॉफीतील 7 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आकिबच्या 60 विकेट्सच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये निवडीवर टीका केली होती.



आयपीएलमधील अपयश


दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आकिब नबीला आयपीएल 2026 मध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. 5 सामन्यांत त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. निवड समितीने त्याच बाबीचा विचार केल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 ते 10 जूनदरम्यान मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात आकिबला अंतिम संघात संधी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप; 2030 स्पर्धेची धुरा आता भारताकडे

Commonwealth Games 2026  : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला.

Commonwealth Games 2026 : ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताचा अपूर्ण नकाशा; लव्हलिना बोरगोहेन यांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या यशस्वी कामगिरीनिमित्त ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आयोजित

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; 39 पदकांसह चौथे स्थान, बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण

ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत पदकतालिकेत चौथे स्थान

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धूमधडाका, ९१ चेंडूत केल्या एवढ्या धावा की प्रतिस्पर्धी धास्तावले

नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा