विश्वासात घेतलं, घरात प्रवेश मिळवला अन् 25 लाखांचा डल्ला! अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास संपादन करून घरात वावरणाऱ्या एका महिलेने लाखो रुपयांचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Entertainment News)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची घटना अभिनेत्रीच्या आईच्या घरात घडली. घरातील दागिने आणि काही मौल्यवान वस्तू अचानक गायब झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला वस्तू नेमक्या कुठे गेल्या याबाबत संभ्रम होता. मात्र, संशय वाढल्यानंतर एका महिलेची चौकशी करण्यात आली.

राशी छाबडिया असे अटक करण्यात आलेल्या ४७ वर्षीय महिलेचे नाव आहे. ती गेल्या काही वर्षांपासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती. विशेषतः अभिनेत्रीच्या आईची देखभाल करण्यासाठी ती नियमितपणे घरात येत होती. त्यामुळे कुटुंबीयांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.



पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घरातील तिजोरीत ठेवलेले सोने, हिऱ्यांचे दागिने तसेच दोन महागडी घड्याळे चोरीला गेली आहेत. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी काही चोरीची घड्याळे जप्त करण्यात यश मिळवले आहे. मात्र, दागिन्यांचा मोठा भाग अद्याप सापडलेला नाही. चोरीतील इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच उर्वरित दागिने कुठे आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही घरातील विश्वासू व्यक्तींविषयी सावध राहण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून