Sanjay Ghadi Deputy Mayor BMC : नाल्यात कचरा टाकणे टाळा, उपमहापौरांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईची सुमारे ८० टक्के कामे पूर्णत्वाकडे आली असली तरी नाल्यांमध्ये अजूनही तरंगता कचरा आढळत असल्याने नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन उपमहापौर संजय घाडी यांनी केले. नालेसफाई ही जशी महानगरपालिकेची जबाबदारी आहे, तशीच ती नागरिकांचीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उपमहापौर घाडी यांनी मंगळवारी वांद्रे (पूर्व) परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. खेरवाडी नागरी आरोग्य केंद्र, पटेल नर्सिंग नथ्थुराम चौहान मंडई, तीन बंगला परिसरातील नाले, शांतीलाल कंपाऊंडमधील शौचालय नूतनीकरण काम, गोळीबार नाला, पूरनियंत्रण दरवाजे तसेच सांताक्रुझ येथील विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालयाला त्यांनी भेट दिली.




खेरवाडी नागरी आरोग्य केंद्रातील २५ खाटांच्या प्रसूतिगृह इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य सेवांबाबत समाधान व्यक्त करताना परिसर स्वच्छता आणि सुशोभीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.पटेल नर्सिंग नथ्थुराम चौहान मंडईत मासळी विक्रेत्या महिलांशी संवाद साधून मंडईच्या नूतनीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शांतीलाल कंपाऊंडमधील सार्वजनिक शौचालयाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.



गोळीबार नाल्यावरील फ्लड गेट्सची पाहणी करताना पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त उदंचन पंप बसविण्याची सूचना घाडी यांनी केली. विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.यावेळी कार्डिनल ग्रेशस विद्यालयालाही त्यांनी भेट दिली. पावसाळ्यात शाळेच्या परिसरात पाणी साचण्याच्या समस्येकडे शाळा प्रशासनाने लक्ष वेधले असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन घाडी यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा, आरोग्य सेवा आणि पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून