Virushka Dance Video : RCB चा ऐतिहासिक विजय! विजयानंतरचा विराट - अनुष्काचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६चे विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र या विजयापेक्षा अधिक चर्चेत राहिलेला क्षण म्हणजे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा मैदानातील आनंदोत्सव आणि डान्स व्हिडिओ, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Virushka Dance Video)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात Virat Kohli याने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी करत Royal Challengers Bengaluru ला पाच विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयासह आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. (Virushka Dance Video)

सामन्यादरम्यान एक नाट्यमय क्षणही पाहायला मिळाला, जेव्हा विराट ६५ धावांवर असताना त्याच्या झेलबाबत शंका निर्माण झाली. मैदानावरील निर्णयानंतर विराटने तातडीने पंचांकडे रिप्ले पाहण्याची मागणी केली आणि त्याचा निर्णय अखेर त्याच्या बाजूने लागला. तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया आणि त्यावेळी स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा उत्साह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. (Virushka Dance Video)

सामना संपताच अनुष्का मैदानात दाखल झाली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारत विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर स्टेडियममध्ये वाजणाऱ्या संगीताच्या तालावर विराट आणि अनुष्काने एकत्र डान्स केला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि भावनिक क्षणांनी चाहत्यांची मनं जिंकली. (Virushka Dance Video)

काही क्षणांतच या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि #Virushka हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. लाखो चाहत्यांनी या जोडीच्या सेलिब्रेशनला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Virushka Dance Video)



विजयानंतर विराट कोहली विशेष टी-शर्टमध्येही दिसला. “One Felt Nice, We Did It Twice” असा संदेश असलेला हा टी-शर्ट सलग दुसऱ्या विजेतेपदाचा आनंद व्यक्त करत असल्याचे मानले जात आहे. आरसीबीच्या संपूर्ण संघानेही मैदानात ट्रॉफीसह जल्लोष करत हा विजय साजरा केला. (Virushka Dance Video)

या ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक क्षण लक्षवेधी ठरले असले, तरी विराट – अनुष्काचा डान्स आणि त्यांचा एकत्रित आनंदोत्सव हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांनी या दोघांना “पॉवर कपल” म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Virushka Dance Video)
Comments
Add Comment

Sunetra Pawar : खो-खो असोसिएशन होणार पेपरलेस, २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत खो खो असोसिएशन बैठक पार खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी