Mayor's Cup : महापौर चषकावर शिर्सेकर्स अॅकॅडमीची दुहेरी मोहोर

मुंबई (प्रतिनिधी) :


मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने दादर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात आयोजित मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६ मध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅकॅडमीने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुटावर कब्जा केला. तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेने मुंबई पोलिसांवर मात करत महापौर चषक पटकावला.



पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅकॅडमीने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा ११-९ असा एक डाव आणि दोन गुणांनी पराभव करत विजेतेपद मिळवले. रामचंद्र झोरे, धीरज भावे, प्रतिक देवरे, ऋषिकेश मूर्चावडे आणि निहार दुबळे यांच्या दमदार कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला.


महिला गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अॅकॅडमीने सरस्वती कन्या संघावर १०-३ असा एकतर्फी विजय मिळवत चषकावर नाव कोरले. साक्षी वाफेलकर, देविका अहिरे, सृष्टी पाष्टे, साक्षी पारसेकर आणि मनाली दुपारगुडे यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात सेंट्रल रेल्वेने मुंबई पोलिसांचा १३-११ असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. शुभम थोरात, अर्णव पाटणकर, अवधूत पाटील, रामजी कश्यप, दिलीप खांडवी आणि आकाश कदम यांच्या अष्टपैलू खेळामुळे सेंट्रल रेल्वेला विजेतेपद मिळाले.



स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब तोरसकर, सुरेंद्र विश्वकर्मा, नरेंद्र कुंदर, पांडुरंग परब, डलेश देसाई, श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर आणि रुपेश शेलटर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



चुरशीचे सामने, उत्कृष्ट खेळ आणि खेळाडूंची जिद्द यामुळे यंदाची मुंबई महापौर चषक स्पर्धा क्रीडारसिकांसाठी विशेष आकर्षण ठरली.

Comments
Add Comment

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या

ICC Ranking : आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये मोठा ट्विस्ट! रोहित-विराटला होणार फायदा ?

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Rohit Sharma - Ravi Shastri : 'रोहितने आपल्या खेळीतून टीकाकारांच्या गालावर चपराक लगावली!' – लॉर्ड्समधील शतकानंतर रवी शास्त्रींची रोखठोक प्रतिक्रिया

मुंबई : इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळलेल्या १३८ धावांच्या शानदार शतकी खेळीनंतर भारतीय

Kuldeep Yadav : भारतीय संघाच स्थान नाही, शेवटी कुलदीपने घेतला मोठा निर्णय; आता 'या' देशासाठी खेळणार...

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) यॉर्कशायर काउंटी क्लबसोबत करार केला. तो या हंगामात संघासाठी आठ

Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी

वृंदावन : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर प्रेमानंद

Common Wealth Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय संघाची यादी जाहीर! १२६ सदस्यीय ताफ्यात कोण-कोण ?

मुंबई : यंदा कॉमनवेल्थ गेम्स २०२६ संक्षिप्तपणे खेळली जाणार आहे. भारताने १२६ सदस्यीयांची यादी जाहीर केली आहे. यात