जपान :
१८ वर्षांखालील आशिया कप हॉकी स्पर्धेत यजमान जपानने भारताचा ४-२ असा पराभव करत महत्त्वाचे तीन गुण मिळवले. पूल ‘अ’ मधील या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत बरोबरी साधली होती, मात्र जपानने नंतर सलग दोन गोल करत विजय निश्चित केला. सामन्याच्या १५व्या मिनिटाला जपानचा कर्णधार योशिओका माहिरो याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
IPL 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, ३१ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ हंगामाचा शानदार समारोप झाला. जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० ...
भारताकडून २५व्या मिनिटाला आशिष तानी पुर्ती याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत फरक कमी केला. दुसऱ्या सत्रानंतर भारताने आक्रमक खेळ करत ३२व्या मिनिटाला कर्णधार केतन कुशवाहा याच्या गोलमुळे सामना २-२ असा बरोबरीत आणला. मात्र जपानने लगेचच पुनरागमन केले. ३४व्या मिनिटाला यासुई केंगो आणि ४२व्या मिनिटाला ताकाहाशी आओने यांनी गोल करत जपानला ४-२ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.
नवी दिल्ली : देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) पुन्हा एकदा वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही दरवाढ केवळ १९ ...
या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान कायम असले तरी संघाला पुढील सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अहमदाबाद : IPL 2026 च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक मोठे संकट ओढवण्याची वेळ आली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून टीम ...





