Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई : मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने २०२३ साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता.



सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत 'सुमन हेमाडी' या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली. सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमनताईंचे बहुमूल्य योगदान आहे. जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण, आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात.




पहिले गाणे : रुपेरी पडद्यावरचं सुमन कल्याणपूर यांचं पहिलं गाणं 'कोई पुकारे धीरेसे तुझे ऑंख के तारे' हे होतं. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली.
तानसेन पुरस्कार : जरी त्या शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. त्यांनी गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या अजरामर गीताला मानाचा ‘तानसेन पुरस्कार’ लाभला होता.
विविध भाषांवर प्रभूत्व : सुमनजींनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.



लोकप्रिय चित्रपट गीते:
जिथे सागरा धरणी मिळते
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
कशी गवळण राधा बावरली
नाविका रे वारा वाहे रे
केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर
उठा उठा चिऊताई
या लाडक्या मुलांना यो


गाजलेली भावगीते आणि भक्तीगीते:
अक्रुरा नको नेऊ माधवा
आकाश पांघरुनी
केतकीच्या बनी तिथे
केशवा माधवा
जुळल्या सुरेल तारा
जेथे जातो तेथे
नकळत सारे घडले
वाट इथे स्वप्नातिल
शब्द शब्द जपुनि ठेव

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम