मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर १४ आरोपींविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात जॅकलिनला न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे आणि उपलब्ध तथ्यांचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर आरोपींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगमध्ये (Money Laundering) सहभाग असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुंबई (Marathi Actress Weight Loss Journey) : वजन कमी करणं हा मोठा टास्क (Task)सतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातत्य. आहार, विहार, चांगली झोप यासह जर सातत्य ...
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासानुसार, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात असतानाही फसवणुकीचे मोठे रॅकेट चालवले होते. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय किंवा इतर वरिष्ठ सरकारी विभागांतील अधिकारी असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत होता. बनावट ओळख, खोटे फोन कॉल आणि एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून त्याने २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, या कथित बेकायदेशीर कमाईचा वापर आलिशान मालमत्ता, महागड्या गाड्या आणि लक्झरी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी करण्यात आला. ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या कुर्ला–बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी ...





