भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांना सवाल ‘गुन्हेगारांनो भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे’,
ही टॅगलाईन उद्धव ठाकरे यांची होती हे जनाब संजय राऊत विसरले असतील. पुण्यातील विषारी दारूप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली आणि दोषी पोलिसांनाही निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊंनी दाखवली. मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का, म्हणत बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्याचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना एका वाक्याने प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही केली का? असा खडा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. दारूचे नेटवर्क उध्वस्त करण्याचे काम पोलीस करत आहेत. गांजा ओढून, नशाबाजी करून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊत यांनी ते सकाळी सकाळी कुठली हातभट्टी पिऊन बडबड करतात याचे उत्तर एकदा महाराष्ट्राला दिले पाहिजे.
Nashik : बारा बंगला फिल्टरेशन प्लांटचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे, आमदार देवयानी फरांदे यांचे आदेश
नाशिक : शहरातील (Nashik ) प्रभाग क्रमांक ७, १२ व १३ या भागांना पुरेसा व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गंगापूर धरणातून पाणी बारा बंगला येथे आणून ...
एका गटाचे जबाबदार खासदार असलेल्या संजय राऊतांनी पुरावे न देता केवळ माध्यमांसमोर येऊन वायफळ बडबड करण्यापेक्षा कुठल्या आमदाराचे अवैध दारू धंदे आहेत हे सांगण्याची हिंमत करावी. सकाळच्या पत्रकार परिषदेत या अवैध दारूवाल्या आमदारांचे धंदे उघड करावेत, असे आव्हान देत अवैध दारूवाले शोधले तर सर्वाधिक अवैध दारूवाले हे महाविकास आघाडीचे आणि संजय राऊत यांचे समर्थक सापडतील, असा आरोप बन यांनी केला. विधान परिषदेच्या 17 जागांवर महाविकास आघाडीचे 17 उमेदवार उभे केले तरी काहीही फरक पडणार नाही, असे सांगून श्री. बन म्हणाले की सर्व 17 जागी महायुतीचाच विजय होईल यात अजिबात शंका नाही. ही निवडणूक 17 विरुद्ध शून्य अशा फरकाने महायुती जिंकणार आहे. तुम्ही नांदेड, हिंगोली, परभणीवर दावा करा नाहीतर न्यूयॉर्कवर दावा करा. काहीही फरक पडत नाही. रावळपिंडी, लाहोरमध्ये एखादी विधानपरिषदेची निवडणूक असेल तर ती तुम्ही लढायला पाहिजे. कारण भारतातील, महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. तुमचा जयजयकार लाहोर, रावळपिंडी, कराचीत नक्की होईल. त्यामुळे आपल्या पक्षातील लोकांना तिथली विधान परिषद कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. कदाचित तिथे तुम्हाला विजय मिळेल. मराठा समाजासाठी लढा देणे महत्त्वाचे आहे. सरकारनेही मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने केले. या आधीच्या एकाही सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल आदर नव्हता. एकही मागणी मान्य करण्याची हिंमत आधीच्या सरकारने दाखवली नाही, ती देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात 10 टक्के आरक्षण मिळत आहे. मराठवाड्यात 40 डिग्रीच्यावर तापमान असताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये. त्यामुळे आपल्याला आणि समाजबांधवांनाही त्रास होणार आहे. कृपया सरकारला सहकार्य करा. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी सरकार चर्चेला तयार आहे. चर्चेतून तोडगा निघतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी विनंतीही नवनाथ बन यांनी केली.