Nashik Crime News : दिंडोरी तालुक्यातील जांबुटके (Jabutek) येथे जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून करून मृतदेह गोणीत लपवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जांबुटके गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जांबुटके शिवारात योगेश कराटे (३५) व भाऊसाहेब अपसुंदे यांचा रस्त्यावरून वाद होता. त्यामुळे भाऊसाहेब अपसुंदे (६५) यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर योगेश कराटे यांनी सुद्धा गुरुवार (दि. २८) रोजी फिर्याद दाखल केलेली होती. संध्याकाळी दोघे भेटले असता योगेश कराटे यांनी भाऊसाहेब अपसुंदे यांना घरी नेले. तेथे वाद होऊन अपसुंदे यांचा खून केल्याचा संशय कुटुंबियांकडून वर्तवण्यात येत आहे.
'Yellow alert' : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा दीर्घकाळ ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उन्हाने होरपळला आहे. ...
दरम्यान, खून केल्यानंतर भाऊसाहेब यांचा मृतदेह गोणीत भरून ठेवला होता. रात्री पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट दिली असता मृतदेहा शेजारी पावडे व रक्ताने भरलेला दांडा सापडला. यानंतर मृतदेह (Dead Body) दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) उत्तरिय तपासणासाठी पाठवण्यात आआला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)
पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरू ६० वर्षीय महिलेवर हल्ला
दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरून ६० वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील ताथवडे परिसरात घरात मांजरी ये-जा करत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत संबंधित महिला जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यात वीट फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिर्डी : शिर्डीच्या (Shirdi) साईदरबारात श्रद्धा, भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवरही ...
कविता चिंतामणी सोनवणे (वय ६०) या ताथवडे परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी सूर्यवंशी कुटुंब राहते. या कुटुंबाकडे काही मांजरी असून त्या वारंवार सोनवणे यांच्या घरात येत असल्याची तक्रार त्यांनी अनेकदा केली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. या हल्ल्यात कविता सोनवणे गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर त्यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी (Police) संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, केवळ मांजरी घरात येत असल्याच्या कारणावरून झालेल्या या वादाने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या मारहाणीच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे






