Nashik : गेल्या काही दिवसांत अन्न व औषध प्रशासन विभाग अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे तुकाराम मुंढे. कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात नियमभंग करणाऱ्या अन्न व औषध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरु आहे. त्याचा प्रत्यय राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही आला आहे.
'Yellow alert' : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा दीर्घकाळ ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उन्हाने होरपळला आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिकमध्येही अॅक्शन मोडवर
२७ मे रोजी नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. तपासणीत आढळलेल्या संशयास्पद अन्न पदार्थांचा १ लाख १९ हजार ७१२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी दिली आहे.
पंचवटी, मार्केट यार्ड या ठिकाणी मे. नेहा फुड प्रॉडक्टस् या पेढीच्या तपासणीतही विनापरवाना विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पेढीत विक्रीसाठी मैदा पापड आणि स्नॅक्स या दोन अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित १३ हजार ५६८ रुपयांचा ३३६ किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
जेलरोड, नाशिकरोड येथील मे. अंजनी ट्रेडर्स या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी आढळलेले Caffeinated Beverage (Sting) आणि एनर्जी ड्रिंक या दोन अन्न पदार्थांचे नमुने घेवून उर्वरित ३१ हजार ६८० रुपयांच्या १ हजार ५८४ बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) घडलेल्या विषारी दारूकांडानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे ...
मे.बालाजी ट्रेडिंग कंपनी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या पेढीच्या तपासणीत या पेढीत विक्रीसाठी असेलेले रिफाइंड सोयाबीन ऑइल हे खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले, या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेवून ६८ हजार ८६४ रुपयांचा ४३० किलोग्रॅमचा साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
मे.स्वामी बेव्हरेजस, माळेगाव, सिन्नर या पेढीत विक्रीसाठी आढळलेले स्वीटेन्ड कॉरबॉन्टेड बिव्हरेजेस या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून २ हजार ४०० रुपयांच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे. गुरूदत्त छाया डेअरी या पेढीच्या तपासणीत पेढीत अनारोग्य परिस्थितीत पनीर या अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री होत असल्याचे निदर्शनास आले अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३ हजार २०० रुपयांचा १० किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून नष्ट करण्यात आला.
२७ मे रोजी नाशिक जिल्ह्यात केलेल्या तपासणीत घेण्यात आलेले अन्न नमुने विश्लेषणासाठी संबंधित अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त तांबोळी यांनी कळविले आहे.






