नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) महिलांच्या सुरक्षेचा (Women Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीसह तिच्या सहा मैत्रिणींना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने मुलींना जीवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून आडगाव पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिच्या सहा मैत्रिणी नांदूर जत्रा लिंक रोड परिसरातून जात असताना आरोपी दानिश सय्यद याने त्यांचा रस्ता अडवला. यावेळी त्याने एका तरुणीला "मैत्री करणार का?" असा प्रश्न विचारला. मात्र संबंधित तरुणीने स्पष्टपणे नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने सर्व मुलींना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे.
विजापूर : जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा ...
यानंतर आरोपीने कार भरधाव वेगाने चालवत मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. गाडीत असतानाच त्याने मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचा तसेच त्यांचा विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप पीडितांनी आपल्या तक्रारीत केला आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे सर्व मुली प्रचंड घाबरल्या होत्या.
तक्रारीनुसार, आरोपीने केवळ अश्लील वर्तनच केले नाही, तर
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर मिडल-ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम आता थेट मुंबईकरांच्या खिशावर ...





