'परिमाच'चे ३ हजार कोटी रुपयांचे ऑनलाइन बेटिंग सिंडिकेट उघडकीस

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सायप्रस येथील अवैध बेटिंग प्लॅटफॉर्म 'परिमाच'च्या विरोधात सहा राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून ३ हजार कोटी रुपयांच्या ऑनलाइन बेटिंग नेटवर्कवर कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या पथकांनी महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, गुजरात, दमण आणि उत्तर प्रदेशमधील एकूण १७ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांदरम्यान, ईडीने अंदाजे १ कोटी ५६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली. याव्यतिरिक्त, विविध बँक खात्यांमध्ये जमा असलेले अंदाजे ३ कोटी ८० लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.



मुंबई सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपासात असे उघड झाले की, Parimatch.com ऑनलाइन बेटिंगद्वारे प्रचंड नफ्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या मते, या प्लॅटफॉर्मने केवळ एका वर्षात ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अवैध व्यवहार केले.



ईडीच्या तपासात असेही उघड झाले की, बेटिंगशी संबंधित कोट्यवधी रुपयांचे मनी लाँड्रिंग अनेक चालू खात्यांमार्फत केले जात होते. ही खाती सॉफ्टवेअर, फिनटेक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या नावे उघडण्यात आली होती. तपासात असेही उघड झाले की, काही एजंट सीएमएस चॅनेलद्वारे मिळालेली रोख रक्कम आरटीजीएस हस्तांतरणाद्वारे समायोजित करून पैशाची खरी ओळख लपवत होते. त्यानंतर हे पैसे हवाला नेटवर्कद्वारे परदेशात पाठवले जात होते.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान