Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेची तीव्र लाट, गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू ?

नागपूर : नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागपुरात सलग सात दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर होते. नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून, नागरिकांना या उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागपूरमध्ये बुधवारी सलग सातव्या दिवशी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. या भीषण उष्णतेच्या काळात गेल्या २४ तासांत उष्माघाताच्या संशयास्पद स्थितीमुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीव्र उन्हामुळे शहरातील रुग्णालयांच्या शवागारांमध्ये अज्ञात मृतदेहांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून एकूण १४ मृतदेह हाती आले असून, त्यापैकी फक्त बुधवारीच ११ मृतदेह आढळली आहेत. बहुतांश मृतदेह दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत आढळल्याने हे मृत्यू उष्माघाताशी संबंधित असल्याचा दाट संशय आहे.



रेल्वे स्थानक आणि धावत्या गाड्यांमध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू :


गेल्या २४ तासांत नागपूर रेल्वे स्टेशन आणि शहरातून जाणाऱ्या गाड्यांच्या अनारक्षित व स्लीपर कोचमधून ५ मृतदेह आढळले आहेत. यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशनच्या आवारात दोन अज्ञात मृतदेह आढळून आले, तर शहरातून जाणाऱ्या धावत्या गाड्यांमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रचंड उष्णता, प्रवाशांचे आजारपण आणि डब्यांमधील गुदमरल्यासारख्या परिस्थितीमुळे हे मृत्यू झाले असावेत.



शहरातील वेगवेगळ्या परिसरात आढळले मृतदेह :


रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त उर्वरित ५ मृतदेह शहरातील लकडगंज, कळमना, सक्करदरा आणि ताजबाग परिसरात पडून असलेले आढळले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उड्डाणपुलाजवळ ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. तसेच, कळमना येथील एपीएमसी (APMC) फळ बाजारातून एका ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सक्करदरा येथील नंदनवन भागात एका उड्डाणपुलाजवळ सुमारे ५० वर्षांचा एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर दुपारच्या वेळी ताजबाग येथील सुफी दर्ग्याजवळ आणि एका संकुलाजवळून अनुक्रमे ५५ आणि ६० वर्षे वयोगटातील आणखी दोन पुरुषांचे मृतदेह आढळले.



तीन दिवसांतील एकूण आकडेवारी १४ वर :


यापूर्वी २५ ते २६ मे दरम्यान शहराच्या विविध भागांतून आणखी तीन मृतदेह सापडले गेले होते. यामध्ये शासकीय, वैद्यकीय, महाविद्यालय, व रुग्णालय जवळ एक, हिंगणा येथे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौकाजवळ सुमारे ४५ वर्षे वयोगटातील तिसरा मृतदेह सापडला होता.सध्या पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त