मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून कडक उन्हात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड शुक्रवारी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथील अंतरवली सराटीत जाणार आहेत. सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असून, गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या गतिमान हालचालींची माहिती जरांगे यांना दिली जाईल, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे जिंकण्यासाठी घडामोडींना वेग; हितेंद्र ठाकुरांच्या ७१ नगरसेवकांचा ‘भाव’ वाढला मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून ...
मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेऊनही सरकार दरबारी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याचे ते म्हणाले. "मी येत्या ३० तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशाच्या इतिहासात झाले नसेल, असे हे उपोषण असेल. गेल्या वेळी उपोषणासाठी मंडप टाकला होता, पण यावेळी सावलीत बसून उपोषण करणार नाही. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी असाच जाऊन बसणार आहे. मेलो तर मेलो, पण मागे हटणार नाही. माझ्या समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नये," असे त्यांनी सांगितले.
१ जून ते ३१ जुलै दरम्यान यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी मुंबई : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या ...
जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारची बाजू मांडली. "मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. या संपूर्ण विषयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. माझे सहकारी प्रसाद लाड आणि मी स्वतः शुक्रवारी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर काय काय पावले उचलली गेली, याची सविस्तर कल्पना आम्ही त्यांना देणार आहोत", अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.

