Pune : वाढत्या गरमीमुळे धरणाचं पाणी आठलं आणि झाला मोठा चमत्कार...ऐकून व्हाल चक्क

पुणे : धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. भोरमधील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे.प्राचीन ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी आणि इतिहास संशोधकांणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे .दोनशे वर्ष पुराण मंदिर पाहून सर्वांचं मन तृप्त झालं आहे . जवळ जवळ ५० किलो मीटर आत हे मंदिर आहे .


१९२७ मध्ये इंग्रज सरकारने हे धरण बांधले आहे . कालांतराने पाण्याचे प्रमाण वाढत असल्या मुले हे मंदिर पाण्या खाली गेलं होत . परंतु मागील काही वर्षा पासून वाढत्या तापमानामुळे ह्या धरणाचं पाणी आठत . मे महिण्याच्या अखेरीस जेव्हा पाण्याचं प्रमाण कमी होत तेव्हा हे मंदिर बाहेर येत . या मंदिराचं मूळ नाव 'कर्महरेश्वर' असल्याचं सांगितलं जातं. परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे ते 'कांबरेश्वर' म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच वास्तू विशारद, अभियंते, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.


कसं आहे हे मंदिर?
अतिशय सुंदर आणि रेखीव कलाकृती केलेलं हे मंदिर आहे .पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून, कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत. मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा