सांगली शहरातील एका उपनगरातील अल्पवयीन मुलीवर ६४ वर्षीय वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला आमिष दाखवून घरी बोलावले. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान त्याने अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले.
Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण नाशिकमध्ये समोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. खरात प्रकरणाने सामाजिक काय तर राजकीय वर्तुळातही मोठ्या ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो वृद्ध माणूस त्याच्या मुळसोबत राहत होता. तो फिरून गाड्यां दुरुस्ती कहर काम करत होता. काही कारणास्तव त्याची त्या मुलीशी ओळख झाली. संशयित नाईक हा अधूनमधून घरी एकटे असताना पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून घेत होता. नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ च्या सुमारास संशयित सुधीर नाईक याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता करू नकोस, असे तिला धमकावले. त्यानंतरही त्याने अनेक वेळा त्या पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे लाखो रेल्वे (Railway) प्रवाशांना ...
काल पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ती २७आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. आपली मुलगी गर्भवती असल्याचे समोर येताच तिच्या पालकांना धक्का बसला. पालकांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिने एकूण घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली.निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित नाईक याचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. सहाय्यक निरीक्षक कविता नाईक तपास करत आहेत.





