गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता; खान्देश वासियांमध्ये आनंद

खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अहिराणी भाषा गुगल कीबोर्डवर सहज टाईप करता येणार असून, डिजिटल माध्यमातही या मायबोलीचे स्थान निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे खान्देशवासीयांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


अहिराणी ही फक्त बोली नसून खान्देशच्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि परंपरेचा आत्मा मानली जाते. गावखेड्यांतील दैनंदिन व्यवहार, लोकगीते, सण-उत्सव, नातेसंबंध आणि लोकसंस्कृती यामध्ये अहिराणीचा गोडवा आजही टिकून आहे. आता गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान मंचावर या बोलीला स्थान मिळाल्याने तिच्या जतन आणि संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.



या यशामागे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, कवी, संशोधक आणि भाषा प्रेमी यांचे दीर्घकालीन प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून अहिराणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करण्यात येत होते.


गुगलवरील मान्यतेमुळे नव्या पिढीला अहिराणी भाषेशी जोडण्यास मदत होणार असून, डिजिटल युगात मायबोली अधिक सक्षमपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“जी भाषा टिकते, ती संस्कृती टिकते,” या भावनेतून आता अहिराणी अधिक अभिमानाने बोलली, लिहिली आणि जपली जावी, अशी भावना खान्देशवासीयांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात