Thursday, June 25, 2026

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा आनंदाचा अध्याय सुरू झाला आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर या लोकप्रिय जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे दिव्यांकाने जुळ्या बाळांना जन्म दिला असून दोघेही आता ट्विन्सचे आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यं  सोबत सोबत शेअर केली.
दिव्यांका आणि विवेक हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात आवडते कपल जोडप मानले जातात. अनेक वर्षांपासून चाहत्यांकडून त्यांना “गुड न्यूज” कधी देणार असा प्रश्न विचारला जात होता. अखेर या दोघांनी योग्य वेळ आल्यावर कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. दिव्यांका प्रेग्नंट झाल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने त्यांनी ही गोष्ट खासगी ठेवली होती. नंतर सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर या कपलने अधिकृतपणे आनंदाची बातमी जाहीर केली.
यानंतर दिव्यांका आणि विवेक यांनी बेबी शॉवरचे सुंदर फोटो, व्हिडीओ आणि प्रेग्नन्सी प्रवासातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. आता जुळ्या बाळांच्या आगमनामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीही या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
"> सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रेम आणि शुभेच्छा मिळताना दिसत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >