Deputy Chief Minister Eknath Shinde : कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही !

अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे संवेदनशील असून, केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीत निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.शिंदे म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कांदा खरेदी केंद्रे सुरू केली असून सध्या १५ रुपये ८० पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

“कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारला पूर्णपणे माहीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत अमित शाह यांच्याकडून यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,"असे शिंदे म्हणाले.विरोधकांच्या आंदोलनांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी आणि मीडियात झळकण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला जात आहे. ही शेतकऱ्यांच्या हिताची लढाई नसून निव्वळ स्टंटबाजी आहे.”

यूपीए सरकारच्या काळाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, “काँग्रेसच्या सत्ताकाळातही कांद्याने जनतेला रडवले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली नव्हती. आज मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.”कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 
Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र