साप्ताहिक भविष्य, २४ मे २०२६ ते ३० मे २०२६

साप्ताहिक भविष्य, २४ मे २०२६ ते ३० मे २०२६






















































पूर्ण सहकार लाभणार आहे


मेष : आपल्या भावनांवर संयम ठेवा.कोणताही निर्णय घेताना भावनाशील होऊ नका प्रत्यक्षातील वस्तुस्थिती आकलन महत्त्वाचे ठरेल. कोणतेही असे कार्य करू नका की तुम्हाला स्वतः अडचणीत याल. प्रेमिकां साठी चांगला कालावधी. सरकारी कामे करणाऱ्यांसाठी महत्त्वाची कामे सोपवली जातील.मात्र या कालावधीमध्ये महिलांसोबत काम करताना सावधगिरी बाळगा.सप्ताहाच्या मध्यावधी कालामध्ये संततीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना वाहन सावकाश चालवा ही सूचना देणे महत्वाचे आहे.दाम्पत्य जीवनासाठी हा कालावधी चांगला आहे. कुटुंबातील सदस्य एकमेकांना सहयोग करतील ,त्यांच्या मध्ये चांगला समन्वय असेल.कौटुंबिक सुख लाभेल प्रकृतीमध्ये सुधारणा होईल.व्यवसाय धंद्यामध्ये उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढलेले अनुभवास मिळेल. शत्रु हितशत्रू वर आपल्या बुद्धीच्या जोरावर मात कराल. जमीन जुमला यांचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे जातील.


कौटुंबिक सुख लाभेल


वृषभ : कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ-बहीण यांच्या संबंधात काही गोष्टी मध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे.एखाद्या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी आपणावर सोपवण्यात येणार आहे. .त्या मुळे मनावर ताण येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये प्रवासाची शक्यता आहे प्रवास शक्यतो शहराबाहेर होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घेणे. स्वतःचे वाहन स्वतः चालवल्यास चांगले.कोणाशी वाद होऊ देऊ नका.घरातील ज्येष्ठ व्यक्तींना प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता.आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला जास्तीचे काम करावे लागेल विशेषतः सरकारी नोकरीत आपल्या अधिकार कक्षा रुंदावतील. अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता. मात्र आपण आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन कार्य करावे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

अपेक्षित यश प्राप्त होईल


मिथुन : टेक्निकल गोष्टीमध्ये काम करणाऱ्यांना अतिशय उत्तम कालावधी आहे.त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम सफलता मिळणार आहे कुटुंबाच्या दृष्टिकोनातून घरांमध्ये पाहुण्यांची ये-जा राहील.मुलांच्या फर्माईशी पूर्ण करण्यामध्ये आपला जोडीदार व्यस्त राहील.नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सन्मान होईल.उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली सफलता मिळेल. सप्ताहाच्या अखेरीस आपणास नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे पण नवीन कामे विचारपूर्वक घ्या.शेअर मार्केटच्या संबंधित व्यक्तींनी विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.विवाह इच्छुक व्यक्तींचा चांगल्या घराण्यातील व्यक्तींशी विवाह ठरू शकतो.प्रेमात यश लाभून काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील नोकरीविषयक कामे होतील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील गुरुजनांचे सहकार्य मिळेल.


 

व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील


कर्क : घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपण घ्याकुटुंबातील सदस्यांशी लहान मोठ्या कारणांवरून जाणीवपूर्वक वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात असेल, पण ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाची आहे, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेची तारीख पुढे जाऊ शकते.किंवा स्वतः तरी आजारी पडू शकता.सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या अधिकारी व्यक्तीची ओळख असण्याची आवश्यकता भासणार आहे.म्हणजेच मोठ्या व्यक्तीचे सहाय्य घ्यावे लागणार आहे.ते आपणास मिळणार आहे.सर्व कामे वेळेत झाली तरी आपल्या मनाला समाधान असणार नाही.कोणीतरी बाहेरील व्यक्ती आपल्या कार्यावर डाग लावण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.शत्रु हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. आपली देणी आपण देऊ शकाल.

 

विशेष यश मिळेल..


सिंह : शिक्षणासाठी हा कालावधी आपणास चांगला आहे नवीन कुठलातरी छोटा कोर्स पूर्ण करण्याकडे आपले लक्ष राहील कोणत्याही टेक्निकल साईड मध्ये आपल्याला विशेष यश मिळेल.मात्र कोणत्याही कारणास्तव आळस करू नका.जास्त कष्ट आपणास यश देणारा आहे.विद्यार्थी वर्गाला आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. अपेक्षित यश मिळून उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील कुटुंब परिवारातून मदत मिळेल तसेच गुरुजनांचे आशीर्वाद मिळतील शैक्षणिक भाग्योदय होईल परदेशगमनाची शक्यता. नोकरीच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. अपेक्षित फायदे मिळतील पगारवाढ किंवा इतर वृद्धी होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणे फायद्याचे ठरेल मानसन्मान आत वृद्धि होईल. सामाजिक कार्यात रस घ्याल सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे नियोजन करू शकाल प्रवास कार्य सिद्ध राहतील.

पद आणि प्रतिष्ठेत वृद्धि होईल


कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश येणार आहेआपल्या कार्यक्षेत्रात आपण पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरताना पाहून आनंद होईल नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून आपला व्यवसाय विशिष्ट जागेवर नेऊन ठेवण्यात यशस्वी व्हाल स्पर्धकांवर मात कराल.. पद आणि प्रतिष्ठा याच्यामध्ये वृद्धि होईल. काही जुनी थांबलेली कामे परत सुरु होतील. आपल्याला जर काही गुंतवणूक करायची असेल तर सोन्या मध्ये केलेली चांगली ठरणार आहे.व्यापार व्यवसायामध्ये काही देणे घेण्याचे व्यवहार थांबले असतील, तर ते या काळामध्ये पूर्ण होतील.मात्र या कालावधीमध्ये काही गुप्त शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे, त्यांच्यापासून सावध राहणे इष्ट.कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.नोकरीमध्ये अपेक्षित कामे घडून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होण्याची शक्यता आहे परदेशगमन होऊ शकते व्यापार व्यवसाय चांगला चालत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कोणतेही प्रश्न असणार नाहीत. आर्थिक आलेख उंचावेल.

प्रगतीसाठी आत्मपरीक्षणाची गरज


तूळ : रोजच्या कामासह इतर कामांमध्ये जास्तीचा लोड वाढणार आहे. त्या प्रमाणात आपली एनर्जी लेव्हल कमी वाटणार आहे.आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी खूप प्रयत्न कराल पण समाधान आपणास कमीच वाटेल.सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये आपणास आत्मविश्वास कमी असल्याचे भासेल, पण आपण आत्मविश्वासाने कामे करावीत .आर्थिक गुंतवणूक करताना खूप सावधानता पाळली पाहिजे.आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीसाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे, कारण वस्तुस्थिती काय आहे हे आपणाला जाणून घ्यावयास पाहिजे.विद्यार्थ्यांना हा कालावधी खूप महत्त्वपूर्ण आहे. कठीण परिस्थितीमध्ये पण आपण यश संपादन कराल.मात्र वेळेचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल तसेच कुसंगत टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल.

यश खेचून आणाल


वृश्चिक : आपल्या आजूबाजूला अनुकूल वातावरण असेल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट बघत होता.ते काम मार्गी लागल्यामुळे आपल्या उत्साहात व आनंदात भर पडेल आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल.आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच उत्साही राहाल. आपल्यामध्ये उच्च प्रतीचा उत्साह असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार असणार आहात .आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण यश खेचून आणाल .कुठलेही काम आपण धाडसाने कराल मात्र अति आत्मविश्वास टाळणे महत्त्वाचे ठरेल तसेच आपल्या वागणुकीवर व बोलण्यावर ती नियंत्रण हवे इतरांना अपमानास्पद वागणूक देऊ नका अथवा कोणाचाही अपमान करू नका .सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये एखादे कठीण काम समोर येईल, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रगतीची दारे आपणास खुली होतील.या कालावधीमध्ये आपण आपल्या जोडीदाराबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.जीवनात स्थिरता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल.विद्यार्थ्यांना आपल्या दारी क्षेत्रामध्ये संधी प्राप्त होतील.

महत्त्वाच्या वार्ता समजतील


धनु : कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ज्यांचे विवाह करण्यामध्ये अडचणी येत होत्या अशा अडचणी दूर होऊनर त्यांचे विवाह ठरतील. विवाहविषयक बोलणी यशस्वी ठरतील काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील..विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुख शांती पूर्वक चालेल.मात्र आपल्या संतती विषयी काही प्रकृतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संततीच्या भविष्याविषयी आपण चिंतीत असाल.गर्भवती स्त्रियांनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.प्रेमिकांना पण आपल्या नात्या संबंधी आपण गंभीर असावयास पाहिजे, अन्यथा कोणत्या तिसऱ्या व्यक्तीच्या कारणाने आपले ब्रेक-अप होऊ शकते.आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नीट सांभाळा, पोटाच्या विकाराचा संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.प्रकृतीस्वास्थ्य कडे लक्ष देणे आवश्यक आहे.व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. नोकरी मधील परिस्थिती सर्वसामान्य राहून महत्त्वाच्या वार्ता समजतील.

 

अपेक्षित सफलता मिळणार आहे


मकर : आपण जर सरकारी क्षेत्रात काम करत असाल, तर या कालावधीमध्ये आपल्याला अपेक्षित सफलता मिळणार आहे. पदोन्नती अथवा वेतन वृद्धि मिळेल आपल्या कार्यकक्षेत वृद्धि होईल तसेच जबाबदाऱ्याही वाढतील आपली कार्य आपण आपल्या कार्यकक्षेत मध्ये पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. लहान मोठी प्रलोभने टाळा फायद्यात राहाल. फायनान्स आणि रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तरी सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळणार आहेत. ज्यांचे कमिशन एजंट चे काम आहे त्यांनाही या कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.नवदाम्पत्य आपल्या जीवनाचा भरपूर आनंद लुटणार आहेत.स्पर्धा परीक्षेसाठी चे विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांना जास्त अभ्यास करण्याची गरज आहे.कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये गंभीर परिस्थितीमध्ये शत्रूंना तोंड देण्याची तयारी आपली असली पाहिजे.व्यवसायधंद्यात काही वेळेस स्पर्धक बलवान होऊ शकतात त्यांच्या कारवायांकडे लक्ष ठेवून असले पाहिजे.

मार्ग प्रशस्त होतील


कुंभ : आर्थिक दृष्ट्या हा कालावधी आपणासाठी अतिउत्तम आहे .आपणास एकापेक्षा जास्त ठिकाणाहून धनप्राप्ती होऊ शकते .टेक्नॉलॉजी, मीडिया,सोशल मिडीया अशा माध्यमातून आपणाला धनप्राप्ती होऊ शकते.नोकरी करणार्‍या व्यक्तींना महिला सहकार्या कडून सहकार्य मिळणार आहे.त्यामुळे आपण जास्तीची अर्थप्राप्ती करू शकता.एकमेकांच्या सहकार्यामुळे आपण पुढे जाऊ शकता.विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित असेल.आपले शिक्षक तसेच आपले पालक आपणासाठी पूर्ण सहयोग देतील.उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे स्वप्न साकार होऊ शकते कुटुंब परिवारातील सदस्यांचे आपल्याला सहाय्य मिळेल गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. व्यवसाय धंदा मध्ये काही नवीन करारमदार होतील. विशेषतः आयात-निर्यातीच्या व्यवसायांमध्ये विशेष फायदा मिळू शकतो. नोकरीमध्ये आपल्याला वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकते.

अविस्मरणीय कालावधी


मीन : बुद्धिजीवी जातकांना तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींना व नोकरी करणाऱ्यांना सदरील सप्ताह अविस्मरणीय ठरू शकतो. उच्च व प्रतिष्ठित लोकांच्या गाठी भेटी होण्याची शक्यता आहे.त्यांची ओळख पुढे वाढणार आहे, त्याचा उपयोग आपणास लाभप्रद होणार आहे.जे जातक बेकार आहे त्यांना नोकरी मिळेल.जे जातक नोकरी करत आहे त्यांना बढतीचे योग आहेत.आपण जर कुठली जमीन खरेदी किंवा विक्री साठी विचार करत असाल, तर ते आपणासाठी लाभदायक आहे.पण त्यामध्ये थोडासा ताण तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे तरीही यश मिळेल.प्रेमी प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे.समोरून सकारात्मकच उत्तर मिळणार आहे.विवाहासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे.काहींचे विवाह ठरतील तसेच परिचयोत्तर विवाह होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल कुटुंब परिवारामध्ये धावपळीचे वातावरण राहील व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील उत्पन्नात वाढ झालेली दिसेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १० मे २०२६ ते १६ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १० मे २०२६ ते १६ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, ३ मे २०२६ ते ९ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, ३ मे २०२६ ते ९मे २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १२ एप्रिल ते १९ एप्रिल

साप्ताहिक भविष्य, १२ एप्रिल १९ एप्रिल