साप्ताहिक भविष्य, २ ऑगस्ट २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २ ऑगस्ट २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६






















































अनेक संधी येणार आहेत


मेष : आपणास कामाच्या अनेक संधी येणार आहेत. संधीचा योग्य तो फायदा घ्या. .तुमच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मिश्र ग्रहमान असणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वाद असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. नोकरीमध्ये पगार वाढीची शक्यता आहे. सुखात वाढ होणार आहे. आरामदायी वस्तूवर खर्च होणार आहे. नवीन वाहन खरेदी ची शक्यता आहे . धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घेणार आहात. भागीदारी मधील लाभ मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित करणार आहात.नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडेल उत्पन्न वाढेल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील शुभ वार्ता मिळतील.कौटुंबिक सुख लाभेल.

कामाचे श्रेय मिळणार आहे


वृषभ : हा सप्ताह आपणास चांगला आहे. आपल्या कामाचे श्रेय आपणास मिळणार आहे . तुमच्या कामाचा गौरव होईल. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाच्या जबाबदाऱ्या पाडणार आहात.नातेवाईकांची चांगले संबंध असणार आहे स्वतःच्या क्षमतेवर आपला विश्वास असणार आहे. उच्च राहणीमानाचे जीवन जगण्याची शक्यता आहे. दूरचे प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कामे होतील. आपल्या कामामध्ये काय फायदा होणार आहे, काम चांगले होईल याकडे अधिक लक्ष देणे फायद्याचे ठरेल. या कालावधीत समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे समोर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेला कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प किंवा करार करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे.अनेकानेक मार्गानी धनलाभ होण्याची शक्यता.

आर्थिक स्थैर्याचा कालावधी


मिथुन : हा कालावधी आपणासाठी अनुकूल असणार आहे. आपल्या मध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. आपण अनेक व्यक्तींशी चांगले संबंध जोडाल. यातून चांगल्या प्रकारचे ची देवाण-घेवाण होणार आहे. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल. आपण आपल्या घराकडे अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. कुटुंबातील समस्या असतील त्या चांगल्या तऱ्हेने निवारण करा.कोणतेही लहान-मोठे निर्णय शांतचित्ताने घेतल्यास ते फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहारांत बद्दल सतर्क रहा. हा कालावधी आपणासाठी आर्थिक स्थैर्याचा आहे. आपली इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करा. समाजाकडून आपला आदर आणि सन्मान केला. जाईल तुम्ही मित्र-मैत्रिणी प्रिय व्हाल.सकारात्मक राहिल्याने आपली कामे वेळेत होऊन सकारात्मक ऊर्जा राहील. अचानक धनलाभाचे योग.

उत्पन्नात घसघशीत वाढ


कर्क : तुमच्या कारकिर्दीत प्रगती होणार आहे .तुमची काम करण्याची तयारी असणार आहे. तुमच्या साठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक मात्र हुशारीने करा.कोणतेही लहान-मोठे निर्णय पूर्ण विचारांती घेणे गरजेचे आहे तसेच नवीन गुंतवणूक करताना जाहिरातींना किंवा कोणाच्या गोड बोलण्याला बोलू नका सावध राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. तुम्ही अत्यंत आत्मविश्‍वासपूर्वक काम करणार आहात. सरकारी किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. आपल्या हातून भरपूर खर्च होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींचे प्रकृतीच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद रहाणार आहे. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रतिष्ठा वाढणार आहे


सिंह : या कालावधीमध्ये आपण आक्रमक होऊ नका मित्रांसोबत वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातले व्यवहार अगदी सुरळीत राहणार आहेत. तुमची जबरदस्त इच्छा आणि ऊर्जा ही उच्च प्रकारची राहणार आहे. उच्चभ्रू वर्गापासून तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. शत्रूंनी तोंड वर काढले तरी त्यांना तुम्ही चांगले उत्तर देऊ शकणार आहात. तुमचे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला सहकार्य असणार आहे. जमिनीच्या व्यवहारात चांगला फायदा होणार आहे. चांगल्या कार्यासाठी दानधर्म होणार आहे. आपल्या मुलांनाही यश मिळणार आहे.सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट देण्याचे योग आहेत आपल्या हातून दानधर्म होईल. मन धार्मिक तिकडे तसेच सामाजिक कार्यात ओढ घेईल. अध्यात्मिकतिकडे ओढा राहील.

अचानक प्रवास होऊ शकतो


कन्या : नवीन मित्र व नाती जोडली जाणार आहेत. त्यांच्यापासून आपणाला लाभ होणार आहेत. नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे विचार असतील पूर्णपणे विचारपूर्वक निर्णय घ्या .आपल्या व्यापार व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पदावरील प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. सर्वांगीण समृद्धीचा कालावधी आहे. आपले विचार समतोल असू द्यावेत. अध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही सक्रिय असणार आहात. आपणास बढती ची अपेक्षा असेल तर ती होण्याची शक्यता आहे. अचानक प्रवास होऊ शकतो. तो आपणासाठी फलदायी ठरणार आहे.उत्पन्नाचा स्त्रोत व्यवस्थित राहणार आहे. कौटुंबिक आयुष्यात आनंद असणार आहे.नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांच्या या व्यतिरिक्त इतर मार्गांनी सुद्धा उत्पन्न वाढेल.

चांगली संधी मिळू शकते


तूळ : तुमच्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवणार आहात.  व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील.  कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असणार आहात. हा कालावधी आपणास उत्पन्न मिळवून देणार आहे. तुमचा कष्टाचे चीज होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.  आपल्या नातेवाईकांना मुळे काही तणावाचे प्रसंग उद्भवू शकतात. नोकरी करणार्‍या व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांची तुमचा सुसंवाद असू द्यावा.

यश लाभेल


वृश्चिक : तुमच्या समोरील आव्हानांना मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना राबवणार आहात.त्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. यश लाभेल नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. एकापेक्षा अनेक स्रोत उत्पन्नाचे वाढणार आहेत. पण त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. चैनीच्या वस्तूंवर खर्च होणार आहे.अनावश्यक खर्च टाळणे आपल्या हातात आहे. हा कालावधी मिश्र घटनांचा राहणार आहे. आपल्या पालकांची आरोग्याची तक्रार येऊ शकते. आपल्या घरामध्ये धार्मिक कार्य होतील. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी चांगला आहे. नवीन योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्याची शक्यता आहे. यासाठी आपणास साहाय्य मिळेल. तुमच्या भावंडांनी मुळे काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग येऊ शकतात.

योजना कार्यान्वित होतील


धनु : तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक जगामध्ये जास्त रमणार आहात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश चांगले मिळणार आहे. तुमची कष्टाची तयारी असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. आपणास यश निश्चित मिळणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळतील.व्यवसाय धंद्यात नवीन करार महारांच्या संधी मिळतील आर्थिक आलेख उंचावेल. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. घरातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील.घरी किंवा कार्यक्षेत्रामध्ये होणारे बदल आपणासाठी चांगले असणार आहेत. तुम्ही या काळात घेतलेले निर्णय प्रगतीपथावर नेतील. मात्र खर्चावर नियंत्रण राहणार नाही. आपण फायदेशीर व्यवहार करणार आहात. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी राहणार आहेत.

आर्थिक लाभ


मकर : कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास यशस्वी होणार आहात. त्यातून आपणास आर्थिक लाभ होणार आहे.दीर्घ काळ रखडलेले स्थायी संपत्ती अथवा जमीन जंगले यांचे व्यवहार गतिमान होऊन मार्गी लागतील त्यातून भरघोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चित वाढणार आहे. आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. महत्त्वाची कामे करताना नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. नवीन नातेसंबंध जास्त वाढणार नाही. काही वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक स्थैर्य चांगले असणार आहे. प्रवास आणि ज्ञान मिळवणे प्रगति करणे याच्या भरपूर संधी आपणास मिळणार आहेत. आपले कार्यक्षेत्र वाढणार आहे. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहे.

व्यक्तिगत इच्छा पूर्ण होईल


कुंभ : तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आपल्या कामात अडचणी आल्या तरी त्यावर व्यवस्थित मात होईल. तुम्ही शत्रूचा पराजय करण्यास यशस्वी होणार आहात.आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व व्यवहार कुशलतेने आपल्या शत्रूंवर विजय मिळवाल मात्र आपल्या बोलण्यावर व वागणुकीवर नियंत्रण हवे. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाबीमध्ये यशदायी कालावधी आहे. आपल्या विचारांमध्ये विश्वास असणार असल्याने कामे सुरळीत होणार आहेत. बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रवास होण्याची शक्यता. भावंडं कडून आणि जोडीदाराने कडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असू शकतात. करियर मध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करण्याचे टाळा अध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास तुमची व्यक्तिगत इच्छा पूर्ण होईल.व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.

प्रगती निश्चित आहे


मीन : आताचा काळ आपणास अत्यंत समृद्धीचा काळ असणार आहे. या कालावधीचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी येऊ शकत नाही. कुटुंबा कडून आपणास सहकार्य मिळणार आहे.भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी आपण खर्च कराल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील नोकरीमधील उत्पन्न वाढेल तुमची प्रगती निश्चित आहे. उद्योग व्यवसाय आपणास यश मिळणार आहे. नोकरीमध्ये पण आपणास अनुकूल कालावधी आहे .कामाच्या ठिकाणी प्रत्येक बाबीत सखोल विचार करणे आवश्यक आहे अचानक प्रवासाची शक्यता आहे.प्रवास कार्य सिद्ध राहतील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात.पथ्य पाळा. आपण काही भौतिक सुखाच्या वस्तू खरेदी कराल. एखाद वेळेस जमीन आणि यंत्रांची खरेदी होऊ शकते. जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ जुलै २०२६ ते २५ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, १२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, १२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, ५ जुलै २०२६ ते ११ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, ५ जुलै २०२६ ते ११ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, २८ जून २०२६ ते ४ जुलै २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६