Petrol-Diesel Price Hike : इंधन पुन्हा महागले, पेट्रोल ८७ तर डिझेल ९१ पैशांनी महागले

मुंबई : महागाईनं सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात वाढ करण्यात आली असून, आज शनिवारी पुन्हा इंधन दरात ८७ आणि ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) सततच्या घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.



गेल्या १० दिवसांत झालेली ही तिसरी मोठी दरवाढ मानली जात असून, यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. नव्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Price) आता थेट शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. क्रूड ऑईल मार्केटमधील (Crude Oil Market) चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे तेल कंपन्यांवर वाढत असलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.



नव्या इंधन दरांनुसार (Fuel Rates), दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आधी ९८.६४ रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल आता ९९.५१ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किमतीतही (Diesel Price) मोठी वाढ करण्यात आली असून, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९१ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ९१.५८ रुपयांवरून थेट ९२.४९ रुपयांपर्यंत गेला आहे.


दिल्लीमध्ये पेट्रोल आता अवघ्या ४९ पैशांनी शंभरीपासून दूर आहे. दुसरीकडे, मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये पेट्रोल दर (Petrol Rate) आधीच १०० रुपयांच्या पुढे गेला असून, आजच्या नव्या वाढीनंतर इंधन आणखी महाग झालं आहे. सततच्या या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे (Petrol-Diesel Price Hike) सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिराच्या

Srinagar : अनंतनागमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला; जखमी हेड कॉन्स्टेबल हुतात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेड

Kalyan Banerjee : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित

नवी दिल्ली : लोकसभेने तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित