इंग्लंडचा २०२६ विश्वचषक संघ जाहीर; इव्हान टोनी-जॉन स्टोन्सना संधी, फिल फोडेन-कोल पामर संघातून बाहेर

Fifa world cup : २०२६ फिफा विश्वचषकासाठी इंग्लंडचा २६ सदस्यीय संघ अखेर जाहीर करण्यात आला असून मुख्य प्रशिक्षक थॉमस टुशेल यांच्या निवडींनी फुटबॉल विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. अनुभवी जॉन स्टोन्स, जॉर्डन हेंडरसन आणि इव्हान टोनी यांना संघात संधी देण्यात आली आहे, तर फिल फोडेन, कोल पामर आणि ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्ड यांसारख्या स्टार खेळाडूंना बाहेर संघातुन बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे फुटबॉल विश्वात चर्चा रंगली आहे.मँचेस्टर युनायटेडचा डेफएनडेर हॅरी मॅग्वायर हाही संघाबाहेर झाला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, संघ निवडताना टुशेल यांनी केवळ मोठ्या नावांवर भर न देता संघाची रचना, संतुलन आणि खेळशैली लक्षात घेतल्याचं दिसून आलं.


टुशेलचा वेगळा विचार


माजी प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांच्या तुलनेत टुशेल यांनी वेगळी रणनीती स्वीकारली आहे. सर्वोत्तम फॉर्ममधील खेळाडूंऐवजी संघासाठी योग्य संयोजन देणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामुळेच फिल फोडेन, कोल पामर आणि ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्ड यांसारख्या मोठ्या नावांना संघात स्थान मिळालेलं नाही. त्याऐवजी नोनी माडुएके, टिनो लिव्हरामेंटो आणि इव्हान टोनी यांना संधी देत टुशेल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केलं. सध्या फुटबॉल विश्वात tuchelच्या निर्णायवर जोरदार टीका होत आहे.





हॅरी मॅग्वायर बाहेर


हॅरी मॅग्वायरला संघात स्थान न मिळाल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्वतःला जगातील सर्वोत्तम डेफएनडेरंपैकी एक म्हटलं होतं. मात्र, टुशेल यांनी त्याच्यावर विश्वास न दाखवल्याचं स्पष्ट झालं.


लिव्हरपूलचा एकही खेळाडू नाही


विशेष म्हणजे, इंग्लंडच्या या संघात लिव्हरपूलच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेलं नाही. तर मँचेस्टर युनायटेडकडून युवा खेळाडू कोबी मैनूची निवड करण्यात आली आहे. टुशेल यांच्या या धाडसी निर्णयांमुळे इंग्लंडचा संघ आता विश्वचषकात कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण फुटबॉलचाहत्यांचे लक्ष लागलं आहे.





२०२६ फिफा विश्वचषकासाठी इंग्लंड संघ :


गोलरक्षक: जॉर्डन पिकफोर्ड (एव्हर्टन), डीन हेंडरसन (क्रिस्टल पॅलेस), जेम्स ट्रॅफर्ड (मँचेस्टर सिटी)


बचावपटू: रीस जेम्स (चेल्सी), टिनो लिव्ह्रामेंटो (न्यूकॅसल), मार्क गुएही (मँचेस्टर सिटी), एझरी कोन्सा (ॲस्टन व्हिला), जॉन स्टोन्स (मँचेस्टर सिटी), जरेल क्वानसाह (बायर लेव्हरकुसेन), निको ओ'रेली (मँचेस्टर सिटी), डॅन बर्न (न्यूकास्ट होटेल्स), डॅन बर्न (न्यूकास्ट)


मिडफिल्डर्स: डेक्लन राइस (आर्सेनल), इलियट अँडरसन (नॉटिंगहॅम फॉरेस्ट), ज्यूड बेलिंगहॅम (रिअल माद्रिद), जॉर्डन हेंडरसन (ब्रेंटफोर्ड), मॉर्गन रॉजर्स (ऍस्टन व्हिला), कोबी मैनू (मँचेस्टर युनायटेड), एबेरेची एझे (आर्सेनल)


फॉरवर्ड्स: हॅरी केन (बायर्न म्युनिक), इव्हान टोनी (अल-अहली), ऑली वॅटकिन्स (ॲस्टन व्हिला), बुकायो साका (आर्सनल), नोनी माड्यूके (आर्सनल), मार्कस रॅशफोर्ड (बार्सिलोना), अँथनी गॉर्डन (न्यूकॅसल)

Comments
Add Comment

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव

IND vs SL Galle Test : मानव सुथारचा फिरकीचा कहर; श्रीलंकेवर भारताचा 165 धावांनी दणदणीत विजय

गॉल : गॉलच्या मैदानावर भारतीय फिरकीचा असा कहर पाहायला मिळाला की श्रीलंकेचा डाव अखेर 206 धावांवर आटोपला! मानव

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Arjuna Award : बुद्धिबळात १९ व्या वर्षी विश्वविजेत्या झालेल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी

2032 UCI Road World Championships : पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ स्पर्धा; आयोजनाला शासनाचे पाठबळ

पुणे : ग्रँड टूर – २०२६ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद