Delhi Riots Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला दिलासा! आईच्या शस्त्रक्रियेसाठी ३ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : उमर खालिद (Umar Khalid) याला दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. २०२०मधील उत्तर-पूर्व दिल्ली दंगल प्रकरणातील यूएपीए अंतर्गत आरोपी असलेल्या उमर खालिदला त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवीय दृष्टिकोन स्वीकारत न्यायालयाने हा निर्णय दिला असून त्याचवेळी काही कठोर अटीही घालण्यात आल्या आहेत. (Delhi Riots Umar Khalid)



आईच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी न्यायालयाचा दिलासा :


मिळालेल्या माहितीनुसार, उमर खालिद यांच्या आईवर मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. या काळात मुलगा म्हणून तिच्यासोबत राहण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती खालिद यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली होती. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने मर्यादित कालावधीसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. उमर खालिद गेल्या साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असून उत्तर-पूर्व दिल्ली दंगलीतील कथित मोठ्या कटाशी संबंधित यूएपीए प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. (Delhi Riots Umar Khalid)



न्यायालयाच्या कठोर अटी :


अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने स्पष्ट अटी घातल्या आहेत. त्यानुसार उमर खालिद यांना फक्त त्यांच्या निश्चित राहत्या पत्त्यावरच राहावे लागेल
आईला भेटण्यासाठी आणि रुग्णालयात जाण्यासच परवानगी असेल, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी जाण्यास मनाई, 1 लाख रुपयांचा जामीन बाँड भरणे बंधनकारक, जामीन कालावधीत फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरण्याची मुभा, संबंधित मोबाईल क्रमांकाची माहिती तपास यंत्रणेला देणे आवश्यक. न्यायालयाने स्पष्ट केले की, जामिनाचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. (Delhi Riots Umar Khalid)



दिल्ली दंगल प्रकरण पुन्हा चर्चेत :


२०२० मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीत अनेकांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. या प्रकरणात अनेकांवर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास यंत्रणा अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, उमर खालिदला मिळालेल्या अंतरिम जामिनामुळे पुन्हा एकदा दिल्ली दंगल प्रकरण आणि त्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया चर्चेत आली आहे. (Delhi Riots Umar Khalid)

Comments
Add Comment

Major Supreme Court decision : न्यायालयाच्या कामकाजाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी, परवानगीशिवाय शेअर केल्यास होणार कारवाई

नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि थेट प्रक्षेपणाचे (लाइव्ह-स्ट्रीम) चित्रीकरण

Zero's History : शून्याचा पहिला पुरावा कुठे सापडला? भारतातील 'या' प्राचीन मंदिराचा इतिहास जाणून घ्या

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अंकांमध्ये शून्य (Zero) हा सर्वात महत्त्वाचा अंक मानला जातो. बँकिंग (Banking), संगणक (Computer),

PM Narendra Modi : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये! शुक्रवारी होणार मोठा निर्णय; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ

PM Narendra Modi : देशभरात गाजत असलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर केंद्र सरकार (Central Government) आणखी कठोर भूमिका घेणार

Sonam Wangchuk Fast : 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण; हिंसाचार टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Sonam Wangchuk Fast : सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी 26 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. दीर्घ चर्चेनंतर

Sikkim Tunnel Accident : सिक्कीम टनल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 25 झाला

गंगटोक : सिक्कीममधील एनएचपीसीच्या तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात मिथेन

India at UN : संयुक्त राष्ट्र बैठकीत भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा; बलुचिस्तानातील संसाधनांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) उच्चस्तरीय बैठकीत भारताने नैसर्गिक संसाधनांच्या न्याय्य वापराचा मुद्दा उपस्थित करत